Sion Flyover : डेडलाईन ठरली! सायन उड्डाणपुलाच्या कामाला वेग, वाहतुकीसाठी कधी होणार खुला?
Last Updated:
Sion Flyover Renovation in Mumbai : सायन उड्डाणपुलाची पुनर्बाधणी सुरू आहे. पादचाऱ्यांसाठी फूट ओव्हरब्रिज खुला आहे. दोन भुयारी मार्गांपैकी एक पूर्ण झाला दुसरा लवकर सुरू होणार आहे.
मुंबई : मुंबई शहरात अनेक महत्त्वाच्या पुलाचे काम वेगाने सुरु असून नागरिकांचे प्रत्येक पुल कधी सुरु होणार याकडे लक्ष लागले आहे. त्यात सायन उड्डाणपुलासाठी दिलासादायक बातमी समोर आली असून पादचारी आणि वाहतूक दोन्हीसाठी लवकरच सुविधा उपलब्ध होतील.
पावसाळ्यात मिळणार मोठी भेट
सासायन उड्डाणपुलाचे काम पूर्ण होण्याच्या शेवटच्या टप्प्यात असून पादचाऱ्यांसाठी आणि वाहतूक सुविधेसाठी महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. कामाच्या दरम्यान पादचाऱ्यांसाठी पूर्व-पश्चिम मार्ग अधिक सोयीस्कर करण्यासाठी फूट ओव्हरब्रिज उघडण्यात आला आहे. तसेच दोन भुयारी पादचारी मार्गांपैकी एक मार्ग पूर्ण झाला असून येत्या काही दिवसात दुसरा मार्गही चालू होणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की 15 जुलै 2026 पर्यंत उड्डाणपुलाची सर्व कामे पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
advertisement
सायन उड्डाणपुलाचे रेल्वे हद्दीतील काम सुरु
सायन उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील कामात मुख्य रेल्वे मार्ग, जाण्याचे रस्ते आणि दोन भुयारी मार्गांचा समावेश आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्ग पूर्ण झाल्यामुळे पश्चिमेकडील पादचारी वाहतूक व्यवस्थापन केले जाईल. अभिजीत बांगर यांनी अभियंत्यांना दररोज कामाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आणि कामाचे नीट निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होईल.
advertisement
पश्चिमेकडील काम चार टप्प्यांमध्ये सुरू
पश्चिमेकडील काम चार टप्प्यांमध्ये चालू असून 31 मेपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. रेल्वेकडील ताबा मिळाल्यानंतर पूर्व बाजूचे जाण्याचे रस्ते पालिकेच्या ताब्यात येईल. जुन्या पुलाचा उत्तरेकडील भाग पाडला गेला असून दक्षिणेकडील भाग काढण्याचे काम सुरू आहे. शेवटचा गर्डर 31 मेपर्यंत बसविला जाईल. पूर्व बाजूची राहिलेली कामे पूर्ण होण्यासाठी अंदाजे 30 ते 45 दिवस लागणार आहेत.
advertisement
या प्रकल्पानंतर सायन उड्डाणपुल पूर्णतहा सुरक्षित आणि चालू होईल तसेच पादचारी आणि वाहनांनाही अधिक सोयीस्कर मार्ग उपलब्ध होतील. मुंबईकरांसाठी ही एक मोठी सुधारणा ठरणार असून वाहतुकीची गती आणि सुरक्षितता दोन्ही वाढेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 10:21 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Sion Flyover : डेडलाईन ठरली! सायन उड्डाणपुलाच्या कामाला वेग, वाहतुकीसाठी कधी होणार खुला?









