लज्जास्पद! मॉर्निंग वॉकसाठी गेलेली 43 वर्षीय महिला; 2 तरुण जवळ आले अन् नको ते केलं, पुण्यात धक्कादायक घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सकाळी साडेपाचच्या सुमारास ही महिला आपल्या मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी बाहेर पडली होती. बाणेर रस्त्यावरून जात असताना, एका दुचाकीवरून दोन तरुण तिथे आले.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बाणेरसारख्या उच्चभ्रू परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ४३ वर्षीय महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बाणेर परिसरात वास्तव्यास आहे. २६ जानेवारी रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही महिला आपल्या मैत्रिणीसोबत फिरण्यासाठी बाहेर पडली होती. बाणेर रस्त्यावरून जात असताना, एका दुचाकीवरून दोन तरुण तिथे आले. त्यांनी मुद्दाम महिलेचा पाठलाग करत तिच्याशी लज्जास्पद आणि अश्लील कृत्य केलं. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे महिला हादरून गेली.
advertisement
कृत्य केल्यानंतर आरोपींनी दुचाकीचा वेग वाढवला आणि तेथून पळ काढला. पीडित महिलेने याप्रकरणी तातडीने बाणेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अश्लील कृत्य आणि विनयभंगाच्या कलमान्वये दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाणेर पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी करत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
advertisement
पालक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण
बाणेर, बालेवाडी यांसारख्या वर्दळीच्या आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या भागात पहाटेच्या वेळी अशा घटना घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. "पहाटेच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी," अशी मागणी आता नागरिक करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक झरेकर करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 11:07 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
लज्जास्पद! मॉर्निंग वॉकसाठी गेलेली 43 वर्षीय महिला; 2 तरुण जवळ आले अन् नको ते केलं, पुण्यात धक्कादायक घटना









