advertisement

आयफोन अन् 50 हजारांसाठी बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडसोबत केलं असं काही की...;मुंबईतील संतापजनक घटना

Last Updated:

Mumbai Crime News : पोलिसांनी खंडणी आणि सोशल मीडिया धमकी प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पीडित तरुणीने तक्रार दाखल करत न्यायाची मागणी केली आहे.

News18
News18
मुंबई : खंडणीसाठी धमकी दिल्याच्या गंभीर प्रकरणात माटुंगा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहे. सोशल मीडियावर तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्याकडे आयफोन आणि 50 हजार रुपयांची मागणी केल्याचे तपासात उघड झाले आहे.
माटुंगा हादरवणारी प्रियकराची संतापजनक करामत
पीडित तरुणी माहीम परिसरात वास्तव्यास असून त्याच भागात तिचे छोटे दुकान आहे. आरोपी नेहमी खरेदीसाठी तिच्या दुकानात येत असल्याने दोघांमध्ये ओळख झाली. हळूहळू ही ओळख मैत्रीत आणि पुढे प्रेमसंबंधात बदलली. मात्र या नात्याचा गैरफायदा घेत आरोपीने जून 2024 ते जानेवारी 2026 या कालावधीत तरुणीवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती केल्याचा आरोप आहे.
advertisement
तसेच आरोपीने तिचे अश्लील फोटो काढले. फोटो काढण्यास विरोध केल्यास तो शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचेही तक्रारीत सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीने बनावट सोशल मीडिया अकाऊंट तयार करून तिचे खासगी फोटो ऑनलाईन व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे तरुणी मानसिक तणावाखाली गेली होती.
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रियकराचा शोध
अखेर पीडितेने माटुंगा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला असून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सोशल मीडिया अकाऊंट्सची तपासणी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माटुंगा पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
आयफोन अन् 50 हजारांसाठी बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडसोबत केलं असं काही की...;मुंबईतील संतापजनक घटना
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement