advertisement

Road Safety: रस्त्यावरचे ‘मृत्यू’ घटले, पुण्यातील संस्थेचं मोठं काम, पाहा काय केलं, Video

Last Updated:

Road Safety: या सर्व उपक्रमांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

+
Road

Road Safety: रस्त्यावरचे ‘मृत्यू’ घटले, पुण्यातील संस्थेचं मोठं काम, पाहा काय केलं, Video

पुणे: मागील काही वर्षांत पुणे शहरात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. शहरातील अनेक भागांत वारंवार अपघातांच्या घटना घडत होत्या, तर काही ठिकाणे अपघातांचे हॉटस्पॉट म्हणून ओळखली जाऊ लागले होते. या वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली. या प्रयत्नांना समाजसेवक आणि स्थानिक नागरिकांनीही सक्रिय पाठिंबा दिला.
या संयुक्त प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, रस्ते अपघातांत प्राण गमावणाऱ्यांच्या संख्येत गेल्या चार वर्षांतील सर्वात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड येथील डॉ. मोहन गायकवाड हे पुणे शहरात अपघात कमी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. यासंदर्भात त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
अपघात नियंत्रणासाठी संस्कार प्रतिष्ठानचा पुढाकार  
डॉ. मोहन गायकवाड यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून पुण्यासह देशभरात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून, या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला प्राण गमवावा लागत आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
advertisement
यामध्ये दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप करणे, नागरिकांमध्ये हेल्मेट वापराविषयी जनजागृती करणे, रस्ते वाहतुकीचे नियम समजावून सांगणे, सिग्नलचे महत्त्व पटवून देणे, तसेच ज्या ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था आहे त्या ठिकाणांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे. यासोबतच वाहनांचे PUC तपासणी कॅम्पही आयोजित करण्यात येतात. यासर्व उपक्रमांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचेही डॉ. गायकवाड यांनी सांगितलं.
advertisement
आकडेवारी..
पुणे ट्रॅफिक पोलीस आणि पुणे महानगरपालिका (PMC) यांनी दिलेल्या अहवालानुसार, गेल्या चार वर्षांत रस्ते अपघातांत मृत्यू झालेल्यांची संख्या सर्वात कमी नोंदवण्यात आली आहे. 2025 मध्ये (22 डिसेंबरपर्यंत) पुणे शहरात 302 जणांचा अपघातात मृत्यू झाला असून, ही संख्या 2023 आणि 2024 मधील 351 आणि 345 मृत्यूंच्या तुलनेत कमी आहे.
2022 मध्ये 325 मृत्यूंची नोंद झाली होती. अहवालांनुसार 2025 मध्ये हा आकडा 290 पर्यंत घसरल्याचेही सांगण्यात येत आहे. वाहनांची संख्या वाढत असतानाही मृत्यूंच्या संख्येत घट होणे दिलासादायक असले, तरी रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने अजूनही अधिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Road Safety: रस्त्यावरचे ‘मृत्यू’ घटले, पुण्यातील संस्थेचं मोठं काम, पाहा काय केलं, Video
Next Article
advertisement
Ajit Pawar: अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ! सुनेत्रा पवार राज्यात, दिल्लीत कोणाला संधी?
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ! सुनेत्रा पवार राज्यात, दिल्ल
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आ

  • अजितदादांनी अकाली घेतलेल्या एक्झिटने राज्यातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजक

  • अजितदादांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राजकीय जागांवर आता पवार कुटुंबातील

View All
advertisement