एका देशी गाईपासून महिन्याला 30 हजारांची कमाई, शेतकऱ्यानं कसं केलं नियोजन?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
देशी गाईचे दूध 100 रुपये प्रतिलिटर प्रमाणे विकले जाते. त्यामुळे देशी गाईंचं संगोपन फायद्याचं ठरत असल्याचं शेतकरी सांगतात.
advertisement
1/7

भारतात गोपालन हा पूर्वापार चालत आलेला कृषीपुरक व्यवसाय आहे. तसेच गाईला धार्मिक महत्त्वही आहे. त्यामुळेच हिंदू धर्मीय लोक गाईंची पूजा करतात. अलिकडच्या काळात घरोघरी असणारी देशी गाईंची संख्या कमी झाली. तसेच अधिक दूध देणाऱ्या परदेशी किंवा संकरित गाईंचे पालन सुरू झाले.
advertisement
2/7
देशी गाईंच्या संगोपनातूनही भरघोस उत्पन्न मिळवता येते. पुणे जिल्ह्यातील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांनी देशी गाईंच्या संगोपनात हेच दाखवून दिलंय. एका देशी गाईंच्या संगोपनातून ते महिन्याकाठी 30 हजारांचे उत्पन्न घेत आहेत.
advertisement
3/7
हिंजवडीजवळील बोडकेवाडी येथे ज्ञानेश्वर बोडके यांची शेती आहे. याठिकाणी त्यांनी गोपालन सुरू केलंय. त्यांच्याकडे दोन गाई आणि इतर वासरे आहेत. त्यांच्याकडे असणारी गीर जातीची गाय दिवसाला 10 ते 12 लिटर दूध देते. हे दूध शहरात 100 रुपये प्रति लिटर प्रमाणे विक्री केले जाते.
advertisement
4/7
दिवसाला सरासरी 1 हजार रुपये मिळतात. त्यामुळे महिन्याकाठी 30 हजारांपर्यंतचे उत्पन्न एका गाईपासून मिळते. तेसच गाईपासून मिळणारे गोमय, गोमुत्र, गौऱ्या यातूनही त्यांना अधिकचा नफा होतो, असेही बोडके यांनी सांगितले.
advertisement
5/7
गाईच्याच्या संगोपनातून आपण आपलं आरोग्य चांगलं ठेऊ शकतो. तसंच उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे घेता येते. फक्त दुधापासूनच नाही तर गोमूत्र, गोमय, गौऱ्या यांपासूनही पैसे मिळतात. कमी जागेत व कमी गुंतवणूक करून हा व्यवसाय करू शकतो. दुधापासून बनवलेल दही, पनीर, श्रीखंड देखील लोक खरेदी करतात. यातून चांगला नफा मिळत असल्याचे बोडके सांगतात.
advertisement
6/7
राठीया, कांकरीज, लालकन धारिया हे देशी गाईंच्या जातींचे वेगवेगळे ब्रीड आहेत. या दिवसाला 10 ते 12 लिटर दूध देतात. 100 रुपये प्रतिलिटर प्रमाणे दिवसाला हजार तर महिन्याला 30 हजार रुपयांची दूध विक्री केली जाऊ शकते.
advertisement
7/7
तसेच गोमय, गोमुत्र, गौऱ्या यांच्या उत्पन्नासह विचार केला तर वर्षाकाठी एका गाईपासून 3 ते 4 लाखांचे उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे देशी गाईंचे संगोपनही फायद्याचे असल्याचे शेतकरी बोडके सांगतात. (प्राची केदारी, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
एका देशी गाईपासून महिन्याला 30 हजारांची कमाई, शेतकऱ्यानं कसं केलं नियोजन?