PMC Election : पुण्यातील नेत्यांच्या पोरांकडं मोक्कार पैसा, आलिशान गाड्या अन् तोळं तोळं सोनं, पाहा पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Top 5 wealthy candidates In PMC Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिज्ञापत्रानुसार आता पुण्यातील काही श्रीमंत उमेदवारांची नावं समोर आली आहेत. या यादीत माजी खासदार, आमदारांच्या पुत्र, मुली, सुना यांच्या नावांचा समावेश आहे.
advertisement
1/11

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिज्ञापत्रानुसार आता पुण्यातील काही श्रीमंत उमेदवारांची नावं समोर आली आहेत. या यादीत माजी खासदार, आमदारांच्या पुत्र, मुली, सुना यांच्या नावांचा समावेश आहे.
advertisement
2/11
पुण्यातील धनाढ्य नेत्यांच्या यादीत पहिलं नाव येतं ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे यांचं... सुरेंद्र पठारे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांची उमेदवारी फिक्स झाली.
advertisement
3/11
सर्वाधिक श्रीमंत उमेदवार म्हणून सुरेंद्र पठारे यांनी बाजी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पठारे यांच्याकडे एकूण 271 कोटी 85 लाख रुपयांची मालमत्ता आहे. पठारे यांच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, इनोव्हा क्रिस्टा अशी अनेक वाहने आहेत.
advertisement
4/11
तसेच मनसेचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांची नावावर असणारी मालमत्ता समोर आली आहे. वांजळे यांच्याकडे 77 कोटी 65 लाख रुपयांची मालमत्ता आहे.
advertisement
5/11
सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या सायली वांजळे यांनी काही दिवसांपूर्वी हाती कमळ घेतलं. पुण्यातील वारजे भागातून सायली वांजळे या आधी नगरसेविका राहिलेल्या आहेत.
advertisement
6/11
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते शशिकांत सुतार यांचे सुपुत्र पृथ्वीराज सुतार यांनी देखील महापालिका निवडणुकीपूर्वीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची प्रतिज्ञापत्रानुसार 42 कोटी 51 लाख रुपयांची संपत्ती आहे.
advertisement
7/11
महापालिकेची निवडणूक लढवताना उमेदवारी अर्जाबरोबर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार बुलेट, इनोव्हा, निसान मायक्रा सारख्या वाहनांची नोंदणी सुद्धा त्यांच्या नावावर असल्याची माहिती आहे.
advertisement
8/11
माजी आमदार आणि शिवसेनेचे दिवंगत नेते विनायक निम्हण यांचे सुपुत्र चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, आता त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवत औंध बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून निवडणूक लढवत आहेत.
advertisement
9/11
चंद्रशेखर निम्हण यांच्या नावावर 36 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. ऑस्ट्रेलियामधून पदवी प्राप्त केलेल्या निम्हण यांच्याकडे 1 इनोव्हा, 5 दुचाकी आणि 1 बुलेट अशी वाहनं त्यांच्याकडे असून प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 25 तोळे सोनं देखील आहे.
advertisement
10/11
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 25 मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
advertisement
11/11
स्वरदा बापट यांची एकूण कौटुंबिक मालमत्ता 11 कोटी 22 लाख रुपयांची असून त्यांच्याकडे एक दुचाकी, आणि 23 लाखांची क्रेटा गाडी आहे. याशिवाय स्वरदा बापट यांच्याकडे 13 तोळे सोने आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
PMC Election : पुण्यातील नेत्यांच्या पोरांकडं मोक्कार पैसा, आलिशान गाड्या अन् तोळं तोळं सोनं, पाहा पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी!