नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना काळाचा घाला, भोर- महाड मार्गावर टेम्पो 20 फूट दरीत कोसळला; 9 जण गंभीर जखमी
- Published by:Prachi Amale
Last Updated:
भोर तालुक्यातील किवत गावचे रहिवासी आपल्या एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी टेम्पोने महाडला निघाले होते, मात्र वाटेतच काळाना घाला घातला. (अभिजीत पोते, प्रतिनिधी)
advertisement
1/7

पुणे जिल्ह्यातील भोर-महाड मार्गावर प्रवाशांनी भरलेला टेम्पो दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
2/7
या अपघातात 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. चालकाचा ताबा सुटल्याने प्रवाशांनी भरलेला हा टेम्पो थेट 20 फूट खोल दरीत कोसळला. या टेम्पोमध्ये एकूण 15 ते 20 नागरिक प्रवास करत होते. त्यापैकी 9 जण गंभीर जखमी झाले आहेत.
advertisement
3/7
भोर तालुक्यातील किवत गावचे रहिवासी आपल्या एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी टेम्पोने महाडच्या दिशेला निघाले होते. . शिरगावच्या अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो थेट संरक्षक कठडा तोडून दरीत कोसळला.
advertisement
4/7
अपघाताचा मोठा आवाज होताच शिरगाव परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरीत पडलेल्या टेम्पोतून जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले.
advertisement
5/7
दोरखंड आणि मानवी साखळीच्या मदतीने जखमींना 20 फूट खोल दरीतून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
advertisement
6/7
भोर-महाड मार्गावरील घाट रस्ता हा अत्यंत अरुंद आणि धोकादायक वळणांचा आहे. अनेकदा अतिवेग किंवा तांत्रिक बिघाडामुळे येथे अपघात घडतात.
advertisement
7/7
या घटनेमुळे गावकरी संतापले असून प्रशासनाने या मार्गावरील सुरक्षा कठड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना काळाचा घाला, भोर- महाड मार्गावर टेम्पो 20 फूट दरीत कोसळला; 9 जण गंभीर जखमी