भावासाठी कायपण! सरपंच देशमुखांच्या भावाने मानेवर काढला संतोष अण्णांचा टॅटू, फोटोखाली लिहिलेल्या तीन शब्दांचा अर्थ काय?
- Published by:Prachi Amale
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
धनंजय देशमुख यांनी आपल्या मानेवर संतोष देशमुख यांचा अत्यंत रेखीव असा टॅटू काढला आहे. या टॅटूमध्ये संतोष यांचा हसरा चेहरा आहे.
advertisement
1/7

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची 16 महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या केली होती. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी भाऊ धनंजय देशमुख लढा देत आहेत. दरम्यान त्यांनी भाऊ संतोष देशमुख यांच्या आठवणीत केलेल्या कृतीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे.
advertisement
2/7
रक्ताच्या नात्यातील ओढ काय असते आणि भावाचा विरह काळजाला किती घर पाडतो, याचा प्रत्यय केज तालुक्यातील मस्साजोग येथे पाहायला मिळत आहे. १६ महिन्यांपूर्वी वाल्मीक कराडच्या टोळीने सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता.
advertisement
3/7
आज संतोष देशमुख आपल्यात नसले, तरी त्यांचे मोठे बंधू धनंजय देशमुख यांनी आपल्या लाडक्या भावाला कायमचे आपल्यासोबत ठेवण्यासाठी एक भावनिक पाऊल उचलले आहे.
advertisement
4/7
धनंजय देशमुख यांनी आपल्या मानेवर संतोष देशमुख यांचा अत्यंत रेखीव असा टॅटू काढला आहे. या टॅटूमध्ये संतोष यांचा हसरा चेहरा असून त्याखाली 'सत्य-विरा-युद्ध' अशी अक्षरे कोरली आहेत. ही नावे त्यांच्या मुलांची आहेत
advertisement
5/7
माझा भाऊ शरीराने गेला असला तरी तो माझ्या विचारात आणि श्वासात कायम जिवंत आहे," अशी भावना धनंजय यांनी यावेळी व्यक्त केली. न्यायासाठी सुरू असलेला हा लढा केवळ न्यायालयीन नसून तो आता भावनांचा आणि अस्तित्वाचा झाला असल्याचे या टॅटूवरून स्पष्ट होते.
advertisement
6/7
धनंजय देशमुख यांनी टॅटू काढतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले असून, "संतोष अण्णांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा प्रतिक्रिया येत आहेत. लोकनियुक्त सरपंचाची अशा प्रकारे हत्या होणे हे लोकशाहीसाठी घातक असून, गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे, अशी मागणी जनसामान्यातून जोर धरत आहे
advertisement
7/7
संतोष देशमुख यांनी गावासाठी अनेक स्वप्ने पाहिली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब विखुरले नाही, तर अधिक एकवटले आहे. धनंजय देशमुख यांनी भावाच्या मुलांची नावे टॅटूमध्ये समाविष्ट करून, त्यांच्या भविष्याची आणि न्यायाची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याचे अधोरेखित केले आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
भावासाठी कायपण! सरपंच देशमुखांच्या भावाने मानेवर काढला संतोष अण्णांचा टॅटू, फोटोखाली लिहिलेल्या तीन शब्दांचा अर्थ काय?