TRENDING:

आई झरीन खानचे अंत्यसंस्कार हिंदू रितीनुसार का केले? अखेर 5 महिन्यांनी मुलगा जायदनं सोडलं मौन

Last Updated:
बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान यांच्या हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कारावरून वाद निर्माण झाला. त्यांच्या कुटुंबीयांना वाईट पद्धतीनं ट्रोल करण्यात आलं. अखेर त्यांच्या मुलाने या सगळ्यावर मौन सोडलं आहे.
advertisement
1/8
आई झरीन खानचे अंत्यसंस्कार हिंदू रितीनुसार का केले? अखेर 5 महिन्यांनी मुलगा जायदनं सोडलं मौन
2025 मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान यांचं निधन झालं. त्यांच्यावर हिंदू पद्धतीने झालेल्या अंत्यविधीमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू झाली होती. मुस्लिम कुटुंबात लग्न करून पारशी वंशाच्या असूनही त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का करण्यात आले, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला होता.
advertisement
2/8
झरीन खान यांचा मुलगा झायेद खान याने आता या प्रश्नांवर आणि टीकेवर मौन सोडलं आहे. त्याने सांगितलं की, आपल्या आईची शेवटची इच्छा होती की त्यांच्या अस्थी नदीत विसर्जित कराव्यात.
advertisement
3/8
झूमला दिलेल्या मुलाखतीत झायेद खानने स्पष्ट केले की, कुटुंबाने केवळ त्यांच्या अंतिम इच्छेचा आदर केला. झायेदने सांगितले की, "जेव्हा एखाद्याच्या अंतिम इच्छेचा प्रश्न येतो तेव्हा धर्मापेक्षा माणुसकी आणि प्रेम अधिक महत्त्वाचं ठरतं."
advertisement
4/8
झायेद खानने स्पष्टपणे सांगितले की, "आमच्या घरात माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. आमच्या घरातील नोकरचाकर विविध धर्माचे आहेत. पण एकत्र राहतात. आमचं कुटुंब केवळ त्यांच्या उदरनिर्वाहाची आणि अन्नाचीच काळजी घेत नाही तर त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी सर्वतोपरी मदतही करते."
advertisement
5/8
अभिनेता म्हणाला, "आमच्या कुटुंबासाठी धर्म ही एक अत्यंत वैयक्तिक बाब आहे. तुम्ही त्यावर कसा विश्वास ठेवता हे तुमच्यावर अवलंबून आहे. कोणता धर्म चांगला किंवा वाईट यावर चर्चा करायला इथे जागा नाही. आम्ही स्वतःला एक धर्मनिरपेक्ष कुटुंब मानतो आणि आम्ही तसे का आहोत हे कोणालाही स्पष्ट करण्याची किंवा सिद्ध करण्याची आम्हाला गरज नाही."
advertisement
6/8
झायेद खानला त्याच्या आईने तिची शेवटची इच्छा सांगितली होती. तो म्हणाला, "एके दिवशी माझी आई एका सुंदर नदीच्या काठावर बसली होती आणि अचानक तिच्या मनात एक विचार आला. ती म्हणाली, 'जर मी कधी मरण पावले तर माझी राख या नदीच्या लाटांमध्ये विसर्जित व्हावी. मला फक्त मुक्त व्हायचे आहे.'
advertisement
7/8
आईच्या इच्छेला सर्वोच्च प्राधान्य देत झायेद स्पष्टपणे म्हणाला, "माझ्या आईची शेवटची इच्छा काहीही असो ती पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे. जग काय म्हणते किंवा लोक कितीही द्वेष पसरवतात याने काही फरक पडत नाही. मी त्यांना दोष देत नाही कारण सध्याची परिस्थितीच तशी आहे आणि दुर्दैवाने ही परिस्थिती बदलायला वेळ लागेल."
advertisement
8/8
ई अभिनेत्री झरीन खान या झायेद खान आणि सुझॅन खान यांच्या आई होत्या. सुझॅन खान म्हणजेच ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड. झरीन खान 1963 च्या 'तेरे घर के सामने' या चित्रपटात देव आनंद यांच्यासोबत दिसल्या होत्या. 1960 च्या दशकात त्यांची भेट ज्येष्ठ अभिनेते संजय खान यांच्याशी झाली आणि 1966 मध्ये त्यांनी लग्न केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आई झरीन खानचे अंत्यसंस्कार हिंदू रितीनुसार का केले? अखेर 5 महिन्यांनी मुलगा जायदनं सोडलं मौन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल