आता विसर्जनानंतरही असेल बाप्पाची सोबत, पाहा पुण्याच्या अक्षयची संकल्पना
- Published by:News18 Lokmat
- local18
Last Updated:
यंदा कोणत्या नव्या प्रकारच्या गणेशमूर्ती मार्केटमध्ये पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
advertisement
1/6

गणपती अवघ्या एका महिन्यावर आले आहेत. यंदा कोणत्या नव्या प्रकारच्या गणेशमूर्ती मार्केटमध्ये पाहायला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. लालबागचा राजा, दगडूशेठ, शारदा गणेश या एव्हरग्रीन गणेश मूर्तींसोबतच पर्यावरणपूरक मूर्ती घेण्याचा भाविकाचा कल वाढलाय. शाडूच्या मूर्ती तर मागणी आहेच पण यंदा ‘वृक्षगजानन’ या प्रकारातील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरत आहेत.
advertisement
2/6
शंभर टक्के पर्यावरणपूरक अशा शेतमातीपासून या मूर्ती बनवल्या जातात. विसर्जनावेळी या मूर्ती सोबत दिलेल्या कुंडीमध्ये विसर्जित करून त्यामध्ये झाड लावण्यात येते. पुण्यातले डॉ. अक्षय कवठाळे यांची ही संकल्पना आहे.
advertisement
3/6
डॉ. अक्षय विठ्ठल कवठाळे यांनी आपले वडील कृषीशास्त्रज्ञ विठ्ठल कवठाळे यांच्या मदतीने ‘वृक्षगजानन’ ही संकल्पना 2013 मध्ये सुरू केली. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आणि वृक्षारोपणाला जास्तीत जास्त लोकांचा हातभार लागावा यासाठी आम्ही ही संकल्पना सुरू केली. त्याचबरोबर आपले उत्सव योग्य पद्धतीने साजरे व्हावेत हाही यामागे उद्देश आहे.
advertisement
4/6
सुरुवातीला मुर्तीचा आकार, त्यांचा टिकाऊपणा, सप्लाय चेन मेंटेन करणे अशा छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव घेऊन सुधारणा करत 2015 साली हा व्यवसाय सुरू झाला. सध्या महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थानमध्येही या मूर्ती पाठवल्या जातात. त्याचबरोबर दुबई, ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, जपानमध्येही वृक्षगजानन पोहचलाय, अशी माहिती कवठाळे यांनी दिली.
advertisement
5/6
वृक्षगजानन मूर्ती ऑर्डर केल्यानंतर दोन बॉक्स येतात. यातील एका बॉक्समध्ये गणपतीची मूर्ती दिली जाते. त्यासोबत सिल्व्हर कोटेड पाट असतो. दुसऱ्या बॉक्समध्ये कुंडी आणि कृष्णतुळशीच्या बियांचे पाऊचेस दिले जातात.
advertisement
6/6
गणेश मूर्तीच्या मातीची तुळशीच्या रूपाने पूजा होते आणि गणपतीचे पावित्र्य राखले जाते. तुळस ही औषधी वनस्पती आहे त्यामुळे तुळशीच्या बिया देण्याचे आम्ही ठरवलं, असं त्यांनी स्पष्ट केलं. यंदा वृक्षगजाननासोबत ऑथेंटिक ब्रेंझिलच्या बिया दिल्या जाणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आता विसर्जनानंतरही असेल बाप्पाची सोबत, पाहा पुण्याच्या अक्षयची संकल्पना