TRENDING:

पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत पुढचे 24 तास धोक्याचे, हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रासाठी दिला महत्त्वाचा अलर्ट

Last Updated:
Pune Rain: संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात वादळी पावसानं जोरदार हजेरी लावलीये. आज पुन्हा पुणे, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/6
पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत 24 तास धोक्याचे, पश्चिम महाराष्ट्रासाठी IMD चा अलर्ट
राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी वादळी पावसाचा तडाखा सुरूच आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुर्ग, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रतील सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पुढील 24 तास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने आणि उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
2/6
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पंचगंगेच्या पाणीपातळीमध्ये अंशतः वाढ झाली आहे. वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. पुढील 24 तासात कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
3/6
गेल्या 5 दिवसांपासून सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळला. बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला. साताऱ्यातील तापमान 25.6 अंशापर्यंत घटले आहे. पुढील 24 तास देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसातची शक्यता असून दक्षतेचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
4/6
सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे. सोलापुरातील तुरळक ठिकाणी पूर्व मोसमी पावसाची नोंद झाली. तर पुढील 24 तासात कमाल तापमान 33 अंशावर राहण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
5/6
सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस असून पुढील 24 तास देखिल गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहिल. जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून दिवस-रात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे. आज जिल्ह्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरून हलक्या पावसासह आकाश ढगाळ राहिल.
advertisement
6/6
पूर्वमोसमी पावसामुळे आणि ढगाळ आकाशामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. तर वादळी पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठं नुकासन झालं आहे. आज पुन्हा हवामान विभागाने इशारा दिला असून शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत पुढचे 24 तास धोक्याचे, हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रासाठी दिला महत्त्वाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल