मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचे समोर आले आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असे आरोपीचे नाव असून गुन्हा केल्याचे त्याने कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या जबाबात आरोपींने दिली धक्कादायक माहिती दिली आहे.
संपत्तीच्या वादातून केली रंगफेक
संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत रागात आरोपीने हे धक्कादायक कृत्य केल्याची कबुली दिली आहे. दादर पोलिस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जबाब नोंदवल्यानंतर पोलिस अधिक तपास करत आहेत.
advertisement
काय आहे प्रकरण?
सकाळच्या सुमारास मीनाताई ठाकरेंच्या अर्धाकृती पुतळ्यावर अज्ञाताने लाल रंग फेकल्याची घटना समोर आणि शिवसैनिकांनी पुतळ्याजवळ धाव घेतली. शिवसैनिकांनी तात्काळ या परिसराची साफसफाई केली. पण त्याचसोबत या घटनेवरुन संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या. या घटनेची माहिती मिळताच राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी स्मृती स्थळावर येत पाहणी केली. तसेच या प्रकारे मागे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला.