मंजू सिंग यांनी सांगितले की, प्रदर्शनामध्ये विविध इतिहासकालीन नाणी आणि जुन्या चलनाचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक नाणे आणि चलनाला संबंधित काळातील विशेष महत्त्व आहे. या प्रदर्शनात काही वर्षांपूर्वी रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटाही मांडण्यात आल्या आहेत. अनेक नागरिक या नाणी व नोटांची खरेदी करत असून, चलन किती जुने आहे आणि त्याचा क्रमांक काय आहे, यावरून त्याची किंमत ठरवली जाते. प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
शेतकऱ्यांमध्ये या पिकाची मोठी क्रेझ! फक्त 30 दिवसांत करताय 8 लाखांपर्यंत कमाई
प्रदर्शनात नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजे यांच्याशी संबंधित दुर्मिळ नाणी तसेच विदेशी फॅन्सी नाण्यांचा खजिना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत सोनल हॉल, कर्वे रस्ता, पुणे येथे नागरिकांसाठी मोफत खुले आहे.





