पुणेकर सावधान! ‘थर्टी फर्स्ट’ला या चुका कराल तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत, पोलिसांचा 10 दिवस आधीच अलर्ट

Last Updated:

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर जल्लोष करणं महागात पडू शकतं. पुणे पोलिसांनी नियमावली जारी केली आहे.

पुणेकर सावधान! ‘थर्टी फर्स्ट’ला या चुका कराल तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत
पुणेकर सावधान! ‘थर्टी फर्स्ट’ला या चुका कराल तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री शहरभर जल्लोषाचे वातावरण असते. हॉटेल्स, पब, क्लब, लॉज, फार्महाऊस तसेच खासगी ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मित्रपरिवार, कुटुंबीय आणि तरुणाई मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करतात. मात्र या उत्साहाला अनेकदा बेजबाबदार वर्तनाची किनार दिसते. मद्यप्राशन करून वाहन चालवणे, भररस्त्यात धिंगाणा, मारामारी, महिलांची छेडछाड तसेच सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या घटना दरवर्षी घडतात. त्यामुळे यंदा पोलिस प्रशासनाने कोणतीही तडजोड न करता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदाची परिस्थिती अधिक संवेदनशील आहे. शहरात महापालिका निवडणुकांचे वारे सुरू असून, प्रचार, बैठका, कार्यकर्त्यांच्या हालचालींमुळे आधीच पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आहे. त्यातच थर्टी फर्स्टचा जल्लोष असल्याने कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरभर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
advertisement
नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील परवानाधारक हॉटेल्स, पब आणि क्लबना मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र ध्वनिप्रदूषण, क्षमतेपेक्षा अधिक गर्दी, नियमबाह्य मद्यविक्री किंवा अनुचित प्रकार आढळल्यास संबंधित आस्थापनांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. परवाना रद्द करणे, दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्याचे अधिकार पोलिसांकडे राहणार आहेत.
advertisement
मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाईसाठी पोलिसांकडून ब्रेथ अॅनालायझरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौक, नाकाबंदी ठिकाणी तपासणीदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास वाहन जप्ती, मोठा दंड आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कायद्याचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने नववर्ष साजरे करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकर सावधान! ‘थर्टी फर्स्ट’ला या चुका कराल तर ‘हॅप्पी न्यू इयर’ कोठडीत, पोलिसांचा 10 दिवस आधीच अलर्ट
Next Article
advertisement
BJP Shiv Sena Shinde Faction: राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंचा गेम
राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच
  • राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच

  • राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच

  • राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच

View All
advertisement