शरद पवारांच्या मिर्झा समरीन यांचा दानवे पिता पुत्रांना चकवा, ऐनवेळी पलटवली बाजी, भोकरदनचा गड ढासळला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Bhokardan Nagar Palika Election 2025: जालना जिल्ह्यातील भोकरदन हा माजी मंत्री आणि जालन्याचे पाच टर्मचे खासदार रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला ढासळला आहे. भोकरदनमध्ये शरद पवार गटाने त्यांना मोठा दणका दिला आहे.
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन हा माजी मंत्री आणि जालन्याचे पाच टर्मचे खासदार रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला आहे. भोकरदनमधून मागील तीन टर्मपासून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत दानवे यांचा पराभव झाला होता. कल्याण काळे यांनी त्यांना हरवलं होतं. लोकसभेनंतर आता भोकरदन नगरपालिकेत दानवे पिता पुत्रांना मोठा धक्का बसला आहे.
मागील अनेक वर्षांपासून भोकरदनमध्ये दानवे कुटुंबाचं वर्चस्व आहे. मात्र यंदा शरद पवारांनी दानवे पिता पुत्रांना चकवा दिला आहे. भोकरदनमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मिर्झा समरीन विजयी झाल्या झाल्या आहेत. त्यांनी 830 मातांनी बाजी मारली आहे. मिर्झा यांनी भाजपाच्या आशा माळी यांचा पराभव केला आहे.
सुरुवातीच्या काही कलांमध्ये भोकरदनमध्ये आशा माळी आघाडीवर होत्या. इथं दानवे पिता पुत्रांचं वर्चस्व पाहता आशा माळी सहजपणे जिंकतील असं बोललं जात होतं. मात्र अंतिम निकालात मिर्झा समरीन दानवे पिता पुत्रांना चकवा देण्यात यशस्वी झाल्या आहेत. भोकरदनमध्ये आतापर्यंत भाजपाचे 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 9 आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हा रावसाहेब दानवे यांना सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
राष्ट्रवादीच्या समरीन मीर्झा विजयी होताच, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मिरवणूक काढली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवेंनी रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर जोरदार जल्लोष साजरा केला. भल्याभल्यांना चकवा देणारं व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दानवेंना होम पीचवर धक्का बसल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे.
जालना जिल्ह्यात नगराध्यक्ष कुणाचा?
जालना : एकूण जागा 3
advertisement
राष्ट्रवादी SP - 01
भाजप - 02
भोकरदन: -राष्ट्रवादी SP मिरझा समरीन विजयी.
भाजपच्या आशा माळी पिछाडीवर...
परतूर :- भाजपच्या प्रियंका राक्षे आघाडीवर...
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताबाई हिवाळे पिछाडीवर..
अंबड : भाजपच्या देवयानी कुलकर्णी आघाडीवर...
महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाच्या श्रद्धा चांगले पिछाडीवर
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 12:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवारांच्या मिर्झा समरीन यांचा दानवे पिता पुत्रांना चकवा, ऐनवेळी पलटवली बाजी, भोकरदनचा गड ढासळला










