थर्टी फर्स्टआधी पुण्यात एक्साईजचा मद्यतस्करीवर मोठा 'सर्जिकल स्ट्राईक'; 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

Last Updated:

औषधांच्या बॉक्सच्या मागे लपवून ठेवलेल्या १८६ विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. हा सर्व मद्यसाठा गोवा राज्य निर्मित असून महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे.

ट्रकमधून दारूची वाहतूक (AI Image)
ट्रकमधून दारूची वाहतूक (AI Image)
पुणे: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परराज्यातून होणाऱ्या बेकायदेशीर मद्यतस्करीला रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात कंबर कसली आहे. पुणे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धडाकेबाज कारवाईत विभागाने तब्बल ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या रॅकेटमधील पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. औषधांच्या नावाखाली ट्रकमधून दारूची वाहतूक करण्याचा तस्करांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.
सासवड विभागाचा हायवेवर सापळा
पहिली मोठी कारवाई १७ डिसेंबर रोजी सातारा-पुणे महामार्गावर सारोळा (ता. भोर) येथे करण्यात आली. गोव्याहून येणाऱ्या एका संशयित ट्रकमध्ये 'औषधे' असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, सासवड विभागाचे निरीक्षक संभाजी बर्गे आणि त्यांच्या पथकाने ट्रकची सखोल झडती घेतली. यावेळी औषधांच्या बॉक्सच्या मागे लपवून ठेवलेल्या १८६ विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या. हा सर्व मद्यसाठा गोवा राज्य निर्मित असून महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे. या प्रकरणी ट्रक चालक संपत लक्ष्मण गावडे (रा. आंबेगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या घरातूनही जादा साठा जप्त करण्यात आला आहे.
advertisement
उरुळी कांचनमध्ये कारसह सूत्रधार जेरबंद
दुसरी कारवाई १३ डिसेंबर रोजी पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे करण्यात आली. 'के' विभागाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांच्या पथकाने एका आलिशान कारचा पाठलाग करून त्यात गोवा बनावटीच्या १३८ बाटल्या जप्त केल्या. या कारवाईत केवळ चालकालाच नाही, तर तपासाची चक्रे वेगाने फिरवून मद्य पुरवठादार राजू केकान आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार हनुमंत रोकडे यालाही बेड्या ठोकल्या आहेत. याशिवाय आंबेगाव बुद्रुक परिसरात छापा टाकून समीर राऊत यालाही अटक करण्यात आली आहे.
advertisement
प्रशासनाचा इशारा
पुणे एक्साईजचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. दोन्ही कारवायांमध्ये मिळून ट्रक, कार, मोबाईल आणि महागडी विदेशी दारू असा एकूण ४३ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागाने दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
थर्टी फर्स्टआधी पुण्यात एक्साईजचा मद्यतस्करीवर मोठा 'सर्जिकल स्ट्राईक'; 48 लाखांचा मुद्देमाल जप्त
Next Article
advertisement
Eknath Shinde Shiv Sena:  महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय सांगतात
महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय
  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

View All
advertisement