Ajit Pawar: पुण्याचे 'किंग' अजितदादाच! भाजपला फुटला घाम, सेनेचंही पानीपत
- Published by:Prachi Amale
Last Updated:
नगरपरिषदांचे निकलसमोर येताच स्पष्ट झाले आहे की, अजित पवार हेच पुणे जिल्ह्याचे कारभारी आहेत हे सिद्ध झाले आहे.
Pune Nagar Parishad And Nagar Panchayat Election Result 2025: राज्यातील नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पार पडल्या आहेत. त्यानंतर आज या निवडणुकींचे निकाल जाहीर आहेत. गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता एकहाती सत्ता राखलेल्या अजित पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र नगरपरिषदांचे निकलसमोर येताच स्पष्ट झाले आहे की, अजित पवार हेच पुणे जिल्ह्याचे कारभारी आहेत. अजित दादांनी पुणे जिल्हावर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे.
एकेकाळी पिंपरी-चिंचवड शहराची अजित पवार यांचा बालेकिल्ला अशी ओळख होती. परंतु, त्यांच्या बालेकिल्ल्याला भाजपने 2017 मध्ये सुरुंग लावला. 15 वर्षांची राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भाजपने उलथवून टाकली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष दिले. मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे , पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पुण्यामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली. अजित पवारांचे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. जिल्ह्यातील 17 पैकी 10 जागा एनसीपी पार्टीकडे, 1 जागा युतीकडे आहे. निकालानंतर अजित दादांचा जलवा पुणे जिल्हात कायम असल्याचे दिसून आले आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यात 9 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
1) लोणावळा - राजेंद्र सोनवणे
2) दौंड - दुर्गादेवी जगदाळे
3) शिरूर - ऐश्वर्या पाचरणे
4) इंदापूर - भरत शाह
5) जेजुरी - जयदीप बारभाई
6) भोर -रामचंद्र आवारे
7) बारामती - सचिन सातव
8) फुरसुंगी - संतोष सरोदे
9) वडगाव मावळ (नगरपंचायत) - आंबोली ढोरे
advertisement
पुणे जिल्ह्यात 4 ठिकाणी शिवसेनेचे (शिंदे) नगराध्यक्ष
1) चाकण - मनीषा गोरे
2) जुन्नर - सुजाता काजळे
3) राजगुरूनगर - मंगेश गुंडा
4) मंचर -राजश्री गांजले
पुणे जिल्ह्यात 3 ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष
1) सासवड - आनंदी काकी जगताप
2) आळंदी - प्रशांत कुराडे
3) तळेगाव - संतोष दाभाडे
माळेगाव नगरपंचायत या ठिकाणी अपक्ष महिला उमेदवार जयश्री तावरे विजयी झाल्या आहेत. पुणे नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली असून महायुतीतील तीनही पक्षानी या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता तर महाविकास आघाडी एकत्र लढली होती.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 2:20 PM IST











