एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचा विजयी नगराध्यक्षच पळवला, दुसऱ्याच तासाला हातात धनुष्यबाण!

Last Updated:

Shrivardhan Nagar Parishad Results: आमच्याकडे प्रवेश करण्यासाठी विजयी नगराध्यक्षाची मानसिकता आहे, वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले.

श्रीवर्धन नगराध्यक्षपद निकाल
श्रीवर्धन नगराध्यक्षपद निकाल
रायगड (श्रीवर्धन) : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत असतान रायगडमध्ये विजयी नगराध्यक्षाच्या पक्षांतराची तयारी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतुल चौगुले हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात थोड्याच वेळात पक्षप्रवेश करणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला. त्यानुसार २ डिसेंबर २०२५ रोजी २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी शनिवारी मतदान झाले. सर्व संबंधित ठिकाणी आज २१ डिसेंबरला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारपर्यंत सर्वच नगर परिषदांचा निकाल स्पष्ट झाला असून भाजपने शंभरी ओलांडली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अर्धशतक पार केले असून राष्ट्रवादीचेही ४० ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. तुलनेत महाविकास आघाडीची कामगिरी विधानसभेसारखीच निष्प्रभ करणारी ठरली. ठाकरे सेनेचे केवळ ८ ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
advertisement

ठाकरेंचे नगराध्यक्ष अतुल चौगुले शिंदेसेनेत प्रवेश करणार

श्रीवर्धन नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अतुल चौगुले हे दणदणीत मतांनी विजयी झाले. मात्र सुनील तटकरे यांच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिंदे सेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला पडद्याआडून मदत केली. दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊन तटकरे यांच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली.
आमदार भरतशेठ गोगावले, स्थानिक नेते अनिल नवगणे तसेच सेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यामुळे माझा विजय झाला. या सगळ्यांनी मला लाखमोलाचे सहकार्य केले. माझा विजय हा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांचा आहे. शिवसैनिक हा शिवसैनिक असतो. सगळ्यांनीच माझ्या विजयासाठी अतोनात कष्ट केले. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक झाली. या निवडणुकीत जनशक्तीच्या पाठिंब्यावर माझा विजय झाला.
advertisement

होय, पक्षप्रवेशाची चौगुले यांची मानसिकता, लवकरच निर्णय- भरतशेठ गोगावले

वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, आमच्याकडे प्रवेश करण्यासाठी त्याचीही मानसिकता आहे, असे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले. याचाच अर्थ चौगुले यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेच थेटपणे त्यांनी संकेत दिला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचा विजयी नगराध्यक्षच पळवला, दुसऱ्याच तासाला हातात धनुष्यबाण!
Next Article
advertisement
Eknath Shinde Shiv Sena:  महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय सांगतात
महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय
  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

  • महायुतीत भाजप आघाडीवर, पण राजकीय वजन शिंदे गटाचं वाढलं? नगर पंचायतीचे निकाल काय

View All
advertisement