आजचं हवामान: सोलापूरपेक्षा पुणे हॉट! कोल्हापुरात काय स्थिती? पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Weather Update: पुढील 24 तासात विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हवामान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7

राज्यातील उष्णता भयंकर वाढत असून उन्हाच्या होरपळीने लोक हैराण झाले आहेत. 11 एप्रिल रोजी नंदुरबार कृषी विज्ञान केंद्रात राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी 46.5 अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुढील 24 तासात विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आजचा हवामान व तापमान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
आज पुण्यातील कमाल तापमान 39 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहिल. हवामान विभागाने दुपारनंतर ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवला आहे.
advertisement
3/7
कोल्हापूरातील वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत आहे. येथील कमाल तापमान 35 तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
4/7
सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके राहील. जिल्ह्यात उकाडा वाढत असून दुपारनंतर ढगाळ हवामानामुळे काहीसा गारवा निर्माण होईल.
advertisement
5/7
सोलापूर जिल्ह्यातील उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होत आहे. येथील कमाल तापमान 38 तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस इतके राहील. तसेच आज वातावरण निरभ्र राहील.
advertisement
6/7
सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 असेल इतके राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशत: ढगाळ राहील.
advertisement
7/7
पश्चिम महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी लागेल. तर नागरिकांना देखील आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
आजचं हवामान: सोलापूरपेक्षा पुणे हॉट! कोल्हापुरात काय स्थिती? पश्चिम महाराष्ट्रातील हवामान अंदाज