Pune Rain: वारं फिरलं, आता मान्सून धुमाकूळ घालणार, पुणे ते सातारा 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Pune Rain: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत असून पुन्हा मान्सून सक्रीय झाला आहे. आज पुण्यासह 4 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

संपूर्ण राज्यात मान्सून साठी पोषक हवामान होत आहे. राज्यातील तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. आज, 5 जून रोजी राज्यातील अनेक भागात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील उकाडा कायम असून मागील 24 तासात 28 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमानात अंशतः घट होवून गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
advertisement
3/7
कोल्हापुरातील कमाल तापमान 30 अंशांवर राहिले आहे. पुढील 24 तासात कोल्हापुरातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस इतके राहील. उकाड्यात वाढ होऊन ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
advertisement
4/7
पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहिल. गेल्या 24 तासांपासून जिल्हा ढगाळ आकाश राहिले असून विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. सातारा जिल्ह्यासाठी सतर्कतेचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
5/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यातील कमाल तापमान 32 अंशवर राहिले. ढगाळ आकाशासह दोन वेळा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, वाळवा परिसरामध्ये पावसाचा कमबॅक झाला. पुढील 24 तासात सांगली जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचे येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
6/7
पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस इतके राहिल. आकाश ढगाळ होऊन वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
7/7
मान्सूनची चाल आठवडाभरापासून थांबली आहे. मात्र गडगडाटी वादळासह मध्यम पाऊस अनेक जिल्ह्यांत हजेरी लावत आहे. आता पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Pune Rain: वारं फिरलं, आता मान्सून धुमाकूळ घालणार, पुणे ते सातारा 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट