TRENDING:

Weather Alert: काळजी घ्या! पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुणे – साताऱ्याला रेड अलर्ट, आजचा हवामान अंदाज

Last Updated:
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचं तुफान सुरू आहे. 19 ऑगस्ट रोजी पुणे, साताऱ्यातील काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
advertisement
1/7
काळजी घ्या! पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुणे – साताऱ्याला रेड अलर्ट
गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. आज 19 ऑगस्ट रोजी कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने धोक्याचा इशारा कायम आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची तीव्रता कायम आहे. आज पुन्हा घाटमाथा परिसरास रेड अलर्ट देण्यात आला आहे. आजचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/7
मागील 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला. गगनबावडा, शाहुवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसला. राधानगरी धरणाचे सहा दरवाजे खुले झाल्याने 10,068 क्युसिक विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासात कोल्हापूर घाटमाथ्यास मुसळधार पावसाची शक्‍यता असल्याने दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस राहिल.
advertisement
3/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 24.5 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्‍यता आहे. तसेच पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचे सावधानतेचा रेड अलर्ट कायम आहे. उर्वरित पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी कमाल तापमान 26 तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
4/7
मागील 48 तासांपासून रेड अलर्टवर असलेल्या सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण परिसरामध्ये असलेल्या संततधारेने कोयना धरणाची पाणी पातळी 100 टीएमसीकडे पोहचली आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांपर्यंत उघडले आहेत. पुढील 24 तासात देखील सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पाणी पातळीत वाढ होणार असून नदीकडच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
advertisement
5/7
सोलापूर परिसरात मागील 24 तासात 6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 25 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात कमाल तापमान 28 अंशावर राहिल. तसेच पुढील 24 तासात सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
advertisement
6/7
मागील 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानात घट होवून 24.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासात मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान 27 तर कमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतके राहील.
advertisement
7/7
कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट देण्यात आले आहेत. उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा कायम आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert: काळजी घ्या! पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळणार, पुणे – साताऱ्याला रेड अलर्ट, आजचा हवामान अंदाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल