5, 14, 23 जन्मतारखांच्या व्यक्तींसाठी कसं असेल 2025 वर्ष? तुमची एक सही करू शकते तुमचा घात!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्या व्यक्तींची जन्मतारीख 5, 14, 23 असते त्यांचा मूलांक असतो 5. बुध ग्रहाचा विशेष प्रभाव असणाऱ्या या अंकासाठी येणारं नववर्ष कसं असेल, जाणून घेऊया.
advertisement
1/7

अंकतज्ज्ञ सांगतात, 5 अंकावर बुध ग्रहाची सत्ता असते. बुध हा वाणीचा कारक असल्यानं या अंकाच्या व्यक्ती बोलक्या स्वभावाच्या, मिळून-मिसळून राहणाऱ्या आणि प्रत्येक गोष्ट बोलून सोडवणाऱ्या असतात. कोणताही प्रश्न कितीही किचकट असूदे बोलण्यात यांचा हात कुणीही धरू शकत नाही.
advertisement
2/7
2025 हे वर्ष मंगळ ग्रहाचं वर्ष आहे. मंगळ आणि बुध एकमेकांचे मित्रही नाहीत आणि शत्रूही नाहीत. त्यामुळे बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असलेल्या 5 मूलांकाच्या व्यक्तींनी बोलताना जरा संयम बाळगणं आवश्यक आहे. आपण प्रत्येकाला अडचणीत सल्ले द्यायला जातो. आपल्या सल्ल्यांचा वेगळा अर्थ काढून गैरसमज होणार नाहीत याची काळजी आपण यावर्षी घ्यायला हवी.
advertisement
3/7
5 मूलांकाच्या व्यक्ती इतरांकडे शारीरिक नाही, तर मानसिकदृष्ट्या आकर्षित होतात. यातून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच याचा मानसिक त्रासही होऊ शकतो.
advertisement
4/7
2025 वर्षात या व्यक्तींना मज्जासंस्थेशी संबंधित आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यात झोपेचे विकार असतील, विचार करण्याच्या प्रक्रियेत दूषितपणा निर्माण होणे, इत्यादी असू शकतं. तसंच पित्ताशयाशी संबंधित आजार वाढू शकतात. त्यामुळे रात्रीचं जागरण, चमचमीत खाणं नियंत्रणात ठेवलं पाहिजे.
advertisement
5/7
सामाजिक पातळीवर बोलताना गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पूर्ण विचारपूर्वक बोलावं. तुमच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढून तुमच्याविषयी वाईट पसरू शकतं. तसंच सही करण्यापूर्वी कागदपत्र व्यवस्थित तपासा. कागदपत्रांमधून फसवणुकीची शक्यता आहे, मग ती जागा खरेदी असूदे किंवा चेकवरची सही असूदे.
advertisement
6/7
2025 वर्षात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी 5 मूलांकाच्या व्यक्तींनी विष्णूची उपासना करणं फलदायी ठरेल, असा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे. विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्त्रोत्र पठण आपण गणपती आणि मारुतीच्या उपासनेसोबत नित्यनियमानं केलं तर हे वर्ष निश्चितच फलदायी राहिल, असं ज्योतिषांनी सांगितलं.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
5, 14, 23 जन्मतारखांच्या व्यक्तींसाठी कसं असेल 2025 वर्ष? तुमची एक सही करू शकते तुमचा घात!