TRENDING:

जेव्हा शत्रू एकत्र येतील...3 राशींना मे महिना भारी पडेल; ज्योतिषांनी दिली मोठी माहिती

Last Updated:
ज्योतिषशास्त्रात सर्वच महिन्यांना विशेष महत्त्व आहे, परंतु येणारा मे महिना अतिशय खास ठरेल, कारण या काळात अनेक मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्य आणि शुक्राची युती याच महिन्यात होतेय. सूर्याला ग्रहांचा राजा आणि शुक्राला राक्षसांचा गुरू म्हटलं जातं. जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतील तेव्हा उलथापालथ होणार हे नक्की. झारखंडमधील देवघरच्या ज्योतिषांनी याबाबत माहिती दिली आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5
जेव्हा शत्रू एकत्र येतील...3 राशींना मे भारी पडेल; ज्योतिषांनी दिली मोठी माहिती
ज्योतिषी पंडित नंद किशोर मुद्गल यांनी सांगितलं की, मे महिन्यात काही राशींच्या व्यक्तींनी सतर्क राहणं आवश्यक आहे. 19 मे रोजी शुक्र आपल्या स्वराशीत म्हणजेच वृषभमध्ये प्रवेश करेल. तिथे सूर्य आधीपासूनच विराजमान असेल. म्हणजेच 19 मेला या दोन ग्रहांची युती होईल आणि त्यातून राजभंग योग निर्माण होईल. याचाच नकारात्मक परिणाम काही राशींवर होणार आहे. त्या राशी कोणत्या आहेत पाहूया.
advertisement
2/5
मेष : आपल्यावर शुक्र आणि सूर्य ग्रहाच्या युतीचा नकारात्मक प्रभाव पडेल. आपल्यात विनाकारण अहंकार येईल. त्याचा परिणाम कामावर होईल. स्वभावही नकारात्मक होईल. मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. जोडीदारासोबत खटके उडू शकतात. याच काळात शत्रू भारी पडतील, त्यामुळे सावध राहा, काळजी घ्या.
advertisement
3/5
कर्क : राजभंग योगाचा आपल्यावर अत्यंत नकारात्मक प्रभाव पडणार आहे. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त म्हणजेच अति मेहनत करावी लागेल. शत्रू आपल्यावर भारी पडतील, त्यामुळे अडचणीत याल. नोकरीत वरिष्ठांसोबत भांडण होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक ताण येईल. खर्च वाढेल. कदाचित कर्जही घ्यावं लागू शकतं. आपण कंगाल होणार नाही याची काळजी घ्यावी.
advertisement
4/5
तूळ : आपल्यावरसुद्धा या युतीचा <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/saturn-will-change-its-place-five-zodiac-signs-will-face-problems-l18w-mhij-1171985.html">नकारात्मक</a> प्रभाव पडणार आहे. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. या प्रवासात आपलं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरीत अचानक बदली मिळू शकते, ज्यामुळे अस्वस्थ वाटेल. पैशांमुळे नाती तुटतील. पैतृक <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/rare-coincidence-on-akshaya-tritriya-will-bring-luck-to-3-zodiac-signs-l18w-mhij-1172008.html">संपत्ती</a>बाबत वाद निर्माण होईल. पोटाचे आजार उद्भवू शकतात.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
जेव्हा शत्रू एकत्र येतील...3 राशींना मे महिना भारी पडेल; ज्योतिषांनी दिली मोठी माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल