TRENDING:

चारधाम यात्रेत सर्व रेकॉर्ड मोडले! केदारनाथ मंदिरात 36 हजार भाविकांनी दर्शन घेतलं, PHOTOS

Last Updated:
Chardham Yatra 2024 : उत्तराखंडमध्ये 10 मेपासून चारधाम यात्रेला सुरुवात झाली. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. चारधाम यात्रेच्या पहिल्याच दिवशी 36 हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं. हा आकडा मागच्या वर्षापेक्षा खूप मोठा आहे. 
advertisement
1/5
चारधाम यात्रेत सर्व रेकॉर्ड मोडले! केदारनाथमध्ये 36 हजार भाविकांनी दर्शन घेतलं
पहिल्याच दिवशी चारधाम यात्रेतील भाविकांमध्ये प्रचंड प्रसन्न आणि उत्साहाचं वातावरण होतं. मागील वर्षी केदारनाथ यात्रेत 19 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते.
advertisement
2/5
विशेष म्हणजे अक्षय्य तृतीयेच्याच दिवशी उत्तराखंडचं वातावरण अचानक बदललं. यमुनोत्री आणि बद्रिनाथ धाममध्ये जोरदार पाऊस झाला. पर्वतीय भागात पावसासह बर्फवृष्टीही झाल्यामुळे वातावरण प्रचंड थंड झालं होतं. इतकंच नाही तर इथं आणखी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली. केदारनाथचं तापमान 0 ते 2 अंश सेल्सियसदरम्यान होतं. रात्री तर ते शून्याच्याही खाली गेलं. परंतु भाविक उबदार कपडे घेऊन पूर्ण तयारीनिशी आले असल्याने ही थंडी त्यांना सहन झाली.
advertisement
3/5
मागील वर्षी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघताच पहिल्या दिवशी 21 हजार भाविकांनी दर्शन घेतलं होतं. हा आकडा यंदा 36 हजारांपार गेला. भाविकांची ही संख्या रेकॉर्डब्रेक आहे. 
advertisement
4/5
यंदा केदारनाथ धाममध्ये आस्था मार्गही तयार करण्यात आलाय, जेणेकरून दर्शनासाठी भाविकांना कोणतीही अडचण सोसावी लागू नये. 
advertisement
5/5
सध्या बदलतं वातावरण हीच चारधाम यात्रेतील मोठी अडचण आहे. परंतु त्यातही <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/rare-coincidence-has-formed-between-3-planets-which-will-be-beneficial-for-3-zodiac-signs-l18w-mhij-1179845.html">भाविकां</a>मध्ये अत्यंत <a href="https://news18marathi.com/religion/lakshmi-comes-home-is-there-a-specific-auspicious-time-for-goddess-to-enter-the-house-gh-mhrp-1178062.html">प्रसन्न</a> वातावरण आहे हे <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/shani-has-made-an-amazing-coincidence-the-whole-year-is-lucky-for-4-zodiac-signs-l18w-mhij-1179743.html">विशेष</a>. आता बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे 12 मे रोजी उघडतील. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
चारधाम यात्रेत सर्व रेकॉर्ड मोडले! केदारनाथ मंदिरात 36 हजार भाविकांनी दर्शन घेतलं, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल