TRENDING:

घटस्थापनेची तयारी करताय?, सांगलीच्या मार्केटमध्ये मिळतायेत मातीचे आणि नक्षीदार घट, Photos

Last Updated:
शारदीय नवरात्रोत्सवला उद्या 3 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरू होत आहे. आश्विन महिन्यातील शुल्क प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. यंदा हा उत्सव 11 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तसेच, 12 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा होईल. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीची पूजा केली जाते. यामध्ये पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. यावेळी घरोघरी घट बसविले जातात. सध्या सांगलीतील मार्केटमध्ये नेमके कसे घट आले आहेत, याचबाबत लोकल18 चा हा आढावा. (प्रीती निकम)
advertisement
1/5
घटस्थापनेची तयारी करताय?, सांगलीच्या मार्केटमध्ये मिळतायेत मातीचे आणि नक्षीदार..
शारदीय नवरात्रीमध्ये घट म्हणजेच मातीचे कलश स्थापन केले जातात. देवीच्या शक्तीरूपाची पूजा करण्यासाठी घर, मंदिरामध्ये घटस्थापना केली जाते.
advertisement
2/5
घटस्थापनेसाठी बहुतेक लोक मातीचे घट वापरतात. यासाठी कुंभार व्यवसायिकांनी साकारलेले मातीचे कलश बाजारपेठांमध्ये आले आहेत.
advertisement
3/5
सध्या सांगलीतील मार्केटमध्ये निरनिराळ्या प्रकारचे घट पाहायला मिळत आहेत. यामध्ये पारंपारिक पद्धतीचे मातीचे घट तीन प्रकारच्या लहान मोठ्या आकारांमध्ये येतात.
advertisement
4/5
घरच्या पूजेसाठी तांब्याची साईज येते. तर मंदिरांमध्ये आणि मंडळांमध्ये थोड्या मोठ्या आकाराच्या घटांना मागणी आहे. या घटांच्या किंमती 20 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत आहेत.
advertisement
5/5
शहरी भागामध्ये रंगकाम केलेल्या घटांना मागणी आहे. मात्र, ग्रामीण भागात पारंपरिक मातीच्याच काळ्या किंवा लाल घटांना जास्त मागणी आहे, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
घटस्थापनेची तयारी करताय?, सांगलीच्या मार्केटमध्ये मिळतायेत मातीचे आणि नक्षीदार घट, Photos
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल