देवशयनी एकादशीला तुळशी संबंधित हे सोपे उपाय करा, आर्थिक संकट दूर होईल
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
एकादशी तिथीला (देवशयनी एकादशी 2024) भगवान विष्णूची पूजा केल्याने साधकाच्या जीवनात सुख समाधान येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच सर्व प्रकारचे दु:ख, संकटे दूर होतात. या दिवशी भाविक भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा करतात. तसेच भगवान विष्णूचे व्रत ठेवतात.
advertisement
1/8

एकादशी तिथीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय करण्याची सनातन शास्त्रात तरतूद आहे. या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्या संपतात. तुम्हालाही आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर देवशयनी एकादशीला तुळशीशी संबंधित हे उपाय अवश्य करा. या उपायांचा अवलंब केल्याने उत्पन्न आणि सौभाग्यामध्ये भरपूर वाढ होते.
advertisement
2/8
देवशयनी एकादशी कधी असते?दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीच्या दुसऱ्या दिवशी देवशयनी एकादशी साजरी केली जाते. यंदा देवशयनी एकादशी 17 जुलैला आहे.
advertisement
3/8
तुळशीचे उपाय : जगाचा पालनपोषण करणाऱ्या भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल तर देवशयनी एकादशी तिथीला स्नान आणि ध्यान केल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करा. यावेळी कच्च्या दुधात केशर आणि तुळशीची पाने मिसळून भगवान विष्णूला अभिषेक करावा. हा उपाय केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात. यासोबतच आर्थिक संकटही दूर होते.
advertisement
4/8
भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवशयनी एकादशी तिथीचे स्नान व ध्यान करून भगवान विष्णूची पूजा करताना तुळशीमातेची पूजा करावी. मात्र, तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नका. एकादशी पूजेच्या वेळी तुळशी मंत्रांचा जप करा. यानंतर घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावावे. जर तुळशीचे रोप आधीच लावले असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुळशीचे रोप दान करू शकता.
advertisement
5/8
advertisement
6/8
तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात वृद्धी करायची असेल, तर देवशयनी एकादशीला भगवान विष्णूला तांदळापासून बनवलेली खीर अर्पण करा. तसेच खीरमध्ये तुळशीची पाने अवश्य अर्पण करा.
advertisement
7/8
घरामध्ये असलेले वास्तू दोष दूर करायचे असतील तर देवशयनी एकादशीला तुळशीमातेची आरती अवश्य करा. तुम्ही तुळशीमातेची आरती दोन्ही वेळी करू शकता, म्हणजे पूजेच्या वेळी आणि संध्याकाळी. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदेल. तसेच उत्पन्न आणि सौभाग्य वाढेल.
advertisement
8/8
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
देवशयनी एकादशीला तुळशी संबंधित हे सोपे उपाय करा, आर्थिक संकट दूर होईल