TRENDING:

महाशिवरात्री 2026: ज्योतिर्लिंग दर्शनाला जाताय? वेरुळच्या वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग

Last Updated:

Mahashivratri 2026: महाशिवरात्रीला वेरुळच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. याच पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
 छत्रपती संभाजीनगर : वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्ताने दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या काळात मंदिर परिसर तसेच धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढते. भाविकांची गैरसोय होऊ नये आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्री 2026: घृष्णेश्वर दर्शनाला जाताय? वेरुळच्या वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग
महाशिवरात्री 2026: घृष्णेश्वर दर्शनाला जाताय? वेरुळच्या वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग
advertisement

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दि. 14 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत धुळे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीसाठी तात्पुरते मार्गबदल लागू करण्यात आले आहेत. या संदर्भातील आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले असून, संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे वेरूळ व खुलताबाद परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

महाराज वनौषधी शोधायला डोंगरात गेले, पाय घसरला अन्..., छ. संभाजीनगरात हळहळ

advertisement

मार्गात कोणते बदल?

View More

कन्नड, वेरूळ व खुलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या वाहनांना आता कसाबखेड फाटा, वरझडी, माळीवाडा आणि शरनापूर फाटा या मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरहून कन्नडकडे जाणारी वाहने शरनापूर फाटा, माळीवाडा, वरझडी व कसाबखेड फाटा मार्गे वेरूळकडे वळवण्यात आली आहेत. यामुळे मुख्य महामार्गावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

याशिवाय फुलंब्री व सुलतानपूर मार्गे कन्नडकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही स्वतंत्र पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या सर्व मार्गबदलांमुळे भाविकांची सुरक्षितता राखण्यासोबतच आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
महाशिवरात्री 2026: ज्योतिर्लिंग दर्शनाला जाताय? वेरुळच्या वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल