तुमचा दिवस शुभ जावा असं वाटतंय? मग सकाळी उठल्यावर चुकूनही पाहू नका 'या' गोष्टी, नाहीतर पश्चाताप कराल!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
सकाळी उठल्यावर आपण सकारात्मक ऊर्जा घेऊन दिवस सुरू करावा अशी इच्छा असते. पण, ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी पाहिल्यास संपूर्ण दिवस नकारात्मकतेने भरतो. सकाळी उठल्यावर...
advertisement
1/8

सकाळी झोपेतून उठल्यावर आपला दिवस चांगला जावा, दिवसातील सर्व कामं व्यवस्थित पार पडावीत, अशी प्रत्येकाची इच्छा असते. कोणताही त्रास किंवा अडचण येऊ नये, अशी आपण आशा करतो. ज्योतिषशास्त्रानुसार, जर आपण सकाळी चांगल्या गोष्टी केल्या किंवा काही चांगलं पाहिलं, तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो.
advertisement
2/8
याउलट, जर आपण सकाळी उठल्याबरोबर काही वाईट बातमी ऐकली किंवा काही अशुभ गोष्ट पाहिली, तर संपूर्ण दिवस खराब होण्याची शक्यता असते. सकाळी उठल्याबरोबर काही विशिष्ट वस्तू पाहणं अशुभ मानलं जातं.
advertisement
3/8
ज्योतिषी हेमंत बरुआ सांगतात की, लोकांनी सकाळी उठल्यावर काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. काही वस्तूंकडे पाहणे टाळावे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी...
advertisement
4/8
आरसा पाहणे : सकाळी झोपेतून उठल्याबरोबर लगेच आरशात पाहणे अशुभ मानले जाते. अंथरुणातून उठल्याबरोबर कधीही आरसा पाहू नका. यामुळे दिवसभर नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
5/8
फुटलेली मूर्ती : सकाळी उठल्याबरोबर तुटलेली किंवा खंडित मूर्ती पाहू नये. यामुळे दिवसभरात अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच, घरात कोणतीही तुटलेली मूर्ती ठेवू नये.
advertisement
6/8
खरकटी भांडी : अनेक लोकांना रात्री जेवणानंतर खरकटी भांडी तशीच स्वयंपाकघरात ठेवण्याची सवय असते. सकाळी उठल्यावर ही खरकटी भांडी पाहिल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते, असं मानलं जातं.
advertisement
7/8
जंगली प्राण्यांचे फोटो : याव्यतिरिक्त, सकाळी उठल्यावर जंगली किंवा हिंस्र प्राण्यांचे फोटो पाहू नयेत. यामुळे तुमचा कोणाशी तरी वाद किंवा भांडण होण्याची शक्यता असते.
advertisement
8/8
त्यामुळे, तुमचा दिवस चांगला आणि सकारात्मक जाण्यासाठी सकाळी उठल्यावर या गोष्टी पाहणे टाळावे, असा सल्ला ज्योतिषशास्त्रात दिला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
तुमचा दिवस शुभ जावा असं वाटतंय? मग सकाळी उठल्यावर चुकूनही पाहू नका 'या' गोष्टी, नाहीतर पश्चाताप कराल!