Shani Shukra Yuti: 5 राशींच्या नशिबाचं दार उघडलं, आता मेहनतीचं फळ मिळणार, सुखद योग जुळून येणार!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Shani Shukra Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह एका ठराविक अवधीनंतर एका राशीतून बाहेर पडतात आणि दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या या राशीप्रवेशाचा सर्व 12 राशींच्या व्यक्तींवर चांगला, वाईट परिणाम होतो. मग त्यातून काही व्यक्तींच्या वाट्याला सुख येतं, तर काही व्यक्तींना दु:ख सोसावं लागतं. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
1/7

जेव्हा 2 ग्रह एकाच राशीत प्रवेश करतात, तेव्हा त्यांची युती झाली असं म्हणतात. 19 जानेवारीला शुक्र आणि शनी या 2 मोठ्या ग्रहांची युती झाली. त्यातून 5 राशींच्या व्यक्तींसाठी सुखद काळ सुरू झालाय, असं ज्योतिषांनी सांगितलं.
advertisement
2/7
वृषभ : या राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती आता भक्कम होईल. मोठी खरेदी होऊ शकते. जोडीदारासोबत नातं घट्ट होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून उत्तम सहकार्य मिळेल. हा काळ नवी जबाबदारी घेऊन येईल.
advertisement
3/7
तूळ : या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अतिशय सुखद असेल. कामकाज विस्तारेल. इतरांकडे किंवा गुंतवणुकीत अडकलेले हक्काचे पैसे परत मिळतील.
advertisement
4/7
मकर : या राशीच्या व्यक्तींसाठी करियरबाबत हा काळ सर्वोत्तम असेल. नवी जबाबदारी मिळेल. घर, जमीन, वाहन खरेदीसाठी वेळ अनुकूल असेल.
advertisement
5/7
कुंभ : या राशीच्या व्यक्तींसाठी करियरमध्ये प्रगतीचा काळ सुरू होईल. नवी संधी मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. प्रेमात, संसारात आणखी गोडवा येईल.
advertisement
6/7
मीन : या राशीच्या व्यक्तींना आनंदाची बातमी मिळू शकते. करियरमध्ये यश मिळेल. कुटुंबात खूप सुख येईल. नाती आणखी घट्ट होतील. अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
7/7
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Shani Shukra Yuti: 5 राशींच्या नशिबाचं दार उघडलं, आता मेहनतीचं फळ मिळणार, सुखद योग जुळून येणार!