TRENDING:

Gudi Padwa 2026: गुढीपाडावा सण का साजरा करतात, गुढी का उभारतात? ‘ही’ तीन कारणं माहिती हवीच!

Last Updated:
Gudi Padwa 2026: हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून देखील गुढीपाडव्याला महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी अनेक शुभ कार्य करण्याची परंपरा आहे.
advertisement
1/5
Gudi Padwa 2026: गुढीपाडावा सण का साजरा करतात, गुढी का उभारतात? ‘ही’ तीन कारणं माहिती हवीच!
गुढीपाडवा हा मराठी नववर्षातील पहिला सण आहे. घरोघरी गुढी उभारून प्रत्येक मराठी कुटुंब नवचैतन्याचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करते. विशेष म्हणजे हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून देखील गुढीपाडव्याला महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी अनेक शुभ कार्य करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो? याबाबत जालना येथील डॉ. राजेश महाराज सामनगावकर यांनी माहिती दिलीय.
advertisement
2/5
गुढीपाडवा या सणाचं थेट प्रभू श्रीरामाशी कनेक्शन सांगितलं जातं. भगवान श्रीरामाचे लंकेवर विजय मिळवून अयोध्येत आगमन झाले. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. त्यामुळेच अयोध्येतील प्रजेने घरोघरी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला. तेव्हापासून ही गुढी उभारण्याची परंपरा सुरू असल्याचं सांगितलं जातं.
advertisement
3/5
गुढीपाडवा या सणाबबत आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. उपचार नावाच्या राजाला इंद्राने कलकी म्हणजेच एक काठी दिली. राजाने राजदरबारात आल्यानंतर त्या काठीवर रेशमी वस्त्र, आंब्याचा लिंबाचा पाला तसेच गाठी लावून इंद्राचं राजदरबारात स्वागत केलं. यामुळे या राजाचा विजय झाला. तेव्हापासून विजयाचं प्रतीक म्हणून चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा करण्यास सुरुवात झाली, असं सामानगावकर सांगतात.
advertisement
4/5
गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे तिसरी एक आख्यायिका सांगितली जाते. शक नावाच्या राजाने पृथ्वीवर उत्पात माजवला होता. तेव्हा कुंभाराचा मुलगा शालिवाहन याने 6500 मातीचे पुतळे तयार केले. त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून प्राण ओतला आणि शक राजासोबत झालेल्या युद्धामध्ये शालिवाहन राजाचा विजय झाला. तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. यामुळेच तेव्हापासून या दिवशी गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली, असंही डॉ. सामानगावकर सांगतात.
advertisement
5/5
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Gudi Padwa 2026: गुढीपाडावा सण का साजरा करतात, गुढी का उभारतात? ‘ही’ तीन कारणं माहिती हवीच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल