TRENDING:

शनीच्या कडक प्रकोपापासून मिळेल सुटका, दर शनिवारी 'या' खास पद्धतीने करा हनुमान चालीसा पठण!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रहाची साडेसाती, अडीचकी किंवा शनी दोषामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. शनी देवाला 'न्यायदेवता' मानले जाते, मात्र हनुमानाची भक्ती करणाऱ्या भक्तांवर शनीची वक्रदृष्टी पडत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.
advertisement
1/7
शनीच्या कडक प्रकोपापासून मिळेल सुटका, दर शनिवारी करा हनुमान चालीसा पठण!
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी ग्रहाची साडेसाती, अडीचकी किंवा शनी दोषामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. शनी देवाला 'न्यायदेवता' मानले जाते, मात्र हनुमानाची भक्ती करणाऱ्या भक्तांवर शनीची वक्रदृष्टी पडत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. जर तुम्ही शनी दोषाने त्रस्त असाल, तर शनिवारी एका विशिष्ट विधीने हनुमान चालीसाचे पठण केल्यास तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो.
advertisement
2/7
पहाटे किंवा संध्याकाळी पठण: शनिवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे किंवा संध्याकाळी हात-पाय स्वच्छ धुवून पूजेला बसावे. शनी दोषासाठी संध्याकाळी हनुमान चालीसा वाचणे अधिक फलदायी मानले जाते.
advertisement
3/7
लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा: हनुमानजींना लाल रंग अत्यंत प्रिय आहे. पूजेच्या वेळी काळे किंवा गडद रंगाचे कपडे घालणे टाळावे. त्याऐवजी लाल किंवा पिवळे धूतवस्त्र परिधान करूनच आसनावर बसावे.
advertisement
4/7
दिवे आणि आसन: पूजेसाठी लाकडी पाटावर लाल कपडा अंथरून त्यावर हनुमानाची प्रतिमा ठेवावी. समोर मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. शनी दोषासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ असते.
advertisement
5/7
7 किंवा 11 वेळा पठण: शनीची पीडा कमी करण्यासाठी केवळ एकदा चालीसा वाचण्यापेक्षा 7 किंवा 11 वेळा पठण करावे. शास्त्रानुसार, "जो शत बार पाठ कर जोई, छूटहि बंदि महा सुख होई" - म्हणजेच जास्तीत जास्त वेळा पठण केल्यास संकटातून लवकर सुटका होते.
advertisement
6/7
नैवेद्य आणि मंत्र: पठण झाल्यानंतर मारुतीरायाला गुळ-फुटाणे किंवा बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा. तसेच 'ॐ शं शनैश्चराय नमः' आणि 'ॐ हनुमते नमः' या मंत्रांचा प्रत्येकी 108 वेळा जप करावा.
advertisement
7/7
पिंपळाच्या झाडाखाली पूजा: शक्य असल्यास शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून हनुमान चालीसाचे पठण करावे. पिंपळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचा वास असतो आणि शनी देवाला हे झाड प्रिय आहे, त्यामुळे येथील पूजा दुप्पट फळ देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनीच्या कडक प्रकोपापासून मिळेल सुटका, दर शनिवारी 'या' खास पद्धतीने करा हनुमान चालीसा पठण!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल