Astrology: अहो साक्षात शिव-पार्वतीची जोडी! विवाह बंधनात 'या' राशींच्या जोड्या जुळल्या तर सुखाचा संसार करतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Best Zodiac Matches For Married Life: खरंतर लग्नानंतर नवरा-बायको दोघांनी सुखाचा संसार करायलाच हवा. कारण भारतीय समाज हा कुटुंब व्यवस्थेवर आधारित आहे आणि त्यामध्ये विवाह हा मुख्य गाभा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज आपण राशींच्या जोड्यांची काही रंजक माहिती जाणून घेणार आहोत. सर्व देवी-देवतांच्या विवाहामध्ये शिव आणि पार्वतीचा विवाह सर्वश्रेष्ठ मानला जातो. हा विवाह चेतना आणि शक्ती यांच्या मिलनचे प्रतीक आहे.
advertisement
1/6

ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या जोड्या अशा असतात की ज्यांचा विवाह झाल्यास त्यांचे नाते अतिशय घनिष्ठ आणि प्रेमाचं राहतं. या जोड्यांमध्ये परस्पर आदर आणि सहनशीलता शिव-पार्वतीच्या विवाहासारखीच दिसून येते, असे मानले जाते.
advertisement
2/6
मेष आणि वृश्चिक रास - ज्योतिषशास्त्रानुसार मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांच्या विवाहाची तुलना शिव-पार्वतीच्या मिलनशी केली जाते. मेष राशीचे लोक उग्र, भावूक आणि नेतृत्व करणारे असतात, तर वृश्चिक राशीचे लोक शांत आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. जेव्हा या दोन शक्ती एकत्र येतात, तेव्हा त्या एकमेकांना पूर्ण करतात. त्यांच्यामध्ये कितीही मतभेद झाले तरी त्यांचे प्रेम कायम टिकून राहते आणि त्यांचे नाते अधिक मजबूत होते.
advertisement
3/6
मेष आणि कुंभ रास - मेष आणि कुंभ राशीच्या लोकांचा विवाह एक आदर्श जोडी मानला जातो. मेष राशीचे लोक सक्रिय आणि धाडसी असतात, तर कुंभ राशीचे लोक बुद्धिमान आणि चिंतनशील असतात. या दोन राशींचे मिलन प्रेम आणि सहकार्याचा एक नवीन आदर्श निर्माण करते. ते एकमेकांना प्रेरणा देतात आणि एकमेकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करतात. त्यांचे वैवाहिक जीवन हास्य, उत्साह आणि आदराचे असते.
advertisement
4/6
सिंह आणि धनु - ज्योतिषशास्त्रात सिंह आणि धनु राशीचे संयोजन एक शक्तिशाली जोडी मानले जाते. या दोन्ही राशींचे लोक आत्मविश्वासू असतात, एकनिष्ठ आणि कष्टाळू असतात. सिंह राशीचे लोक नेतृत्वासाठी ओळखले जातात, तर धनु राशीच्या लोकांना स्वातंत्र्य आणि प्रामाणिकपणा आवडतो. जीवनातील कठीण प्रसंगातही ही जोडी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि संकटांवर विजय मिळवते.
advertisement
5/6
वृषभ आणि कन्या - वृषभ आणि कन्या या दोन्ही पृथ्वी तत्त्वाच्या राशी आहेत. त्यांचे नाते स्थिरता, विश्वास आणि प्रेमावर आधारित असते. वृषभ राशीचे लोक प्रेमात प्रामाणिक असतात, तर कन्या राशीचे लोक काळजी घेणारे आणि विश्लेषक स्वभावाचे असतात. संयम आणि परस्पर आदर त्यांच्या वैवाहिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. कितीही अडचणी आल्या तरी या जोड्या मिळून त्यांचा सामना करतात आणि त्यांचे प्रेम काळाच्या कसोटीवर खरे उतरते.
advertisement
6/6
वृश्चिक आणि मकर - वृश्चिक आणि मकर राशीचे लोक एक अतिशय छान-मजबूत जोडी मानले जातात. वृश्चिक राशीचे लोक भावूक आणि वफादार असतात, तर मकर राशीचे लोक कष्टाळू आणि सहनशील असतात. त्यांचे नाते जवळीक आणि स्थिरतेचे एक उत्तम मिश्रण आहे. मकर राशीचे लोक वृश्चिक राशीच्या भावना सहज समजू शकतात. त्यांचे वैवाहिक जीवन दीर्घकालीन सुख आणि यशाचे प्रतीक मानले जाते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: अहो साक्षात शिव-पार्वतीची जोडी! विवाह बंधनात 'या' राशींच्या जोड्या जुळल्या तर सुखाचा संसार करतात