महाराष्ट्राची वाघिण आता 'The 50' मध्ये, बिग बॉस मराठी गाजवून 'किलर गर्ल'ने मारली मोठी बाजी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस मराठीची किलर गर्ल अभिनेत्री जान्हवी किल्लेकरची The 50 या शोमध्ये एन्ट्री झाली आहे. जान्हवी पोस्ट शेअर करत आनंदाची बातमी दिली.
advertisement
1/8

बिग बॉस मराठी 5 मधून प्रचंड चर्चेत आलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. 'किलर गर्ल' आणि 'टास्क क्वीन' अशी ओळख मिळवलेली जान्हवी किल्लेकर आता हिंदी रिअलिटी शोमध्ये दिसणार आहे. जान्हवीनं नुकतीच आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली आहे.
advertisement
2/8
जान्हवीची The 50 या नव्या हिंदी रिअलिटी शोमध्ये एन्ट्री झाली आहे. हा शो 1 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवीने स्पेशल व्हिडीओ आणि फोटो शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे.
advertisement
3/8
जान्हवी किल्लेकरने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलंय, "किलर गर्ल, टास्क क्विन महाराष्ट्राची वाघीण इज बॅक. Watch me in The 50"
advertisement
4/8
जान्हवीने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं लिहिलंय, "ये शेरनी आ रही हें सबको घालल करने लायन के पॅलेस में." जान्हवी फुल कॉन्फिडन्समध्ये The 50 या शोमध्ये जाण्यासाठी सज्ज झाली आहे.
advertisement
5/8
बिग बॉस मराठी 5 मध्ये जान्हवी किल्लेकरने कोणताही टास्क असो ती संपूर्ण ताकदीने खेळताना दिसली. तिचा स्पष्टवक्तेपणा, धाडसी निर्णय यामुळे ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. बिग बॉस मराठीनंतर आता तिला थेट हिंदी रिअलिटी शोची संधी मिळाल्याने तिला लॉटरीच लागली आहे.
advertisement
6/8
अनेक वर्ष मराठी टेलिव्हिजनवर काम केल्यानंतर जान्हवी किल्लेकर पहिल्यांदाच हिंदी शोमध्ये दिसणार आहे. जान्हवीचा फॅन नॅशनल लेवलवर वाढणार आहे. जान्हवी किल्लेकरचा The 50 मधील खेळ किती प्रभावी ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हिंदी प्रेक्षकांसमोर जान्हवी कशी छाप पाडते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
advertisement
7/8
जान्हवी किल्लेकरबरोबरच बिग बॉस मराठी 5 चे कपल निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल हे दोघेही The 50 मध्ये दिसणार आहे. त्यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
advertisement
8/8
त्याचप्रमाणे बिग बॉस मराठी 2 चा विजेता आणि बिग बॉस 16 चा रनरअप शिव ठाकरे देखील The 50 या शोमध्ये दिसणार आहे. बिग बॉस मराठीच्या या सगळ्या स्पर्धकांना पुन्हा एकदा रिअलिटी शोमध्ये पाहणं प्रेक्षकांसाठी खास सरप्राइज ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
महाराष्ट्राची वाघिण आता 'The 50' मध्ये, बिग बॉस मराठी गाजवून 'किलर गर्ल'ने मारली मोठी बाजी