वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या 7 किमी लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
- Reported by:Anis Shaikh
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Mumbai - Pune Express Way Traffic : खोपोली–बोर घाट परिसरात प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
advertisement
1/7

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुन्या मुंबई–पुणे महामार्गावर शनिवारी सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वीकेंडमुळे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या अचानक वाढल्याने ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
advertisement
2/7
खोपोली–बोर घाट परिसरात प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः खोपोली आणि खंडाळा घाटात सर्वाधिक वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
advertisement
3/7
सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच अवजड वाहनांनी लेनशिस्त न पाळल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली आहे.
advertisement
4/7
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर ही कोंडी अधिक तीव्र असून सुमारे सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
advertisement
5/7
यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक वाहनचालक तासन्तास कोंडीत अडकून पडले आहेत.
advertisement
6/7
वाहतूक पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून वाहतूक कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली आहे.
advertisement
7/7
सध्या रायगड वाहतूक पोलीस, पुणे वाहतूक पोलीस तसेच महामार्ग वाहतूक पोलीस संयुक्तपणे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असून कोंडी कमी करण्याचे काम सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या 7 किमी लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO