शाहिद कपूरच्या बायकोच्या सौंदर्यावर प्रसिद्ध डायरेक्टर फिदा, देऊन टाकली स्पेशल ऑफर, मीरा म्हणाली...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Mira Rajput: नुकतंच बॉलिवूडच्या प्रसिद्ध डायरेक्टरने मीराला पाहिलं आणि तो इतका प्रभावित झाला की त्याने थेट तिला स्पेशल ऑफर देऊन टाकली.
advertisement
1/9

बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ही तशी ग्लॅमरच्या जगापासून स्वतःला थोडं लांबच ठेवते. चित्रपटांत काम करण्यापेक्षा तिने स्वतःची ओळख एक यशस्वी बिझनेसवुमन म्हणून निर्माण केली आहे.
advertisement
2/9
पण नुकतंच बॉलिवूडच्या प्रसिद्ध डायरेक्टरने मीराला पाहिलं आणि तो इतका प्रभावित झाला की त्याने थेट तिला आपल्या पुढच्या सिनेमाची ऑफरच देऊन टाकली.
advertisement
3/9
ही दिग्दर्शिका दुसरी कोणी नसून फराह खान आहे. फराह खान सध्या आपल्या यूट्यूब व्लॉग्समुळे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या या 'फूड व्लॉग'मध्ये ती अनेकदा बड्या सेलिब्रिटींच्या घरी जाते किंवा त्यांना भेटून मजेशीर गप्पा मारते.
advertisement
4/9
नव्या व्लॉगमध्ये फराह मीरा राजपूतला भेटायला पोहोचली होती. यावेळी मीराचा कॅज्युअल पण अत्यंत क्लासी आणि एलिगेंट लूक पाहून फराह थक्क झाली. तिने क्षणाचाही विलंब न लावता मीराच्या सौंदर्याची स्तुती करायला सुरुवात केली.
advertisement
5/9
गप्पांच्या ओघात फराह खान मीराला म्हणाली, "मीरा, तू किती सुंदर दिसतेस! खरं तर तू हिरोईन असायला हवी होतीस. काय विचार आहे? माझ्या पुढच्या सिनेमात तू मुख्य भूमिकेत काम करशील का?"
advertisement
6/9
फराहसारख्या मोठ्या दिग्दर्शिकेने थेट कामाची ऑफर दिल्यावर मीरा थोडी लाजली खरी, पण तिने अत्यंत नम्रपणे फराहला नकार दिला. मीराला अभिनयात रस नसून ती आपल्या व्यवसायातच खुश असल्याचं यावेळी दिसलं.
advertisement
7/9
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचं २०१५ मध्ये लग्न झालं होतं. वयातील १३ वर्षांच्या अंतरामुळे सुरुवातीला या जोडीची खूप चर्चा झाली. पण आज दोन मुलं मिषा आणि जैन यांना सांभाळून मीराने स्वतःचं एक वेगळं साम्राज्य उभं केलं आहे.
advertisement
8/9
मीराचा स्वतःचा ब्युटी ब्रँड आहे आणि मुंबईत तिचं एक लक्झरी वेलनेस सेंटरही आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स असून ती फिटनेस आणि स्किनकेअरबाबत सातत्याने मार्गदर्शन करत असते.
advertisement
9/9
शाहिद कपूरने अनेकदा मुलाखतीत म्हटलं आहे की, मीराला सिनेसृष्टीची फारशी ओढ नाही. तरीही फॅशन शोज् किंवा मोठ्या इव्हेंट्समध्ये तिची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेते. फराह खानने दिलेली ही ऑफर मीराने नाकारली असली, तरी चाहत्यांच्या मनात मात्र एकच प्रश्न आहे, "कधीतरी मीरा मोठ्या पडद्यावर दिसेल का?"
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शाहिद कपूरच्या बायकोच्या सौंदर्यावर प्रसिद्ध डायरेक्टर फिदा, देऊन टाकली स्पेशल ऑफर, मीरा म्हणाली...