कंडोम, पिल, कॉपर टीची गरज नाही! हाताला फक्त छोटी स्टिक, 3 वर्षे प्रेग्नन्सीचं टेन्शन नाही; महाराष्ट्रात नवं गर्भनिरोधक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Sub Dermal Contraceptive Implant Stick : नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधकांमध्ये आता आणखी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. जी फक्त एक छोटी काठी आहे, जी हाताला लावली की प्रेग्नन्सी होणार नाही.
advertisement
1/5

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक म्हणून तसे बरेच पर्याय आहेत. सामान्यपणे आतापर्यंत कंडोम, कॉपर टी, गोळ्या आणि इंजेक्शन याचाच वापर केला जातो. आता यापेक्षा आणखी एक नवा कॉन्ट्रासेप्टिव आला आहे. भारतातील काही राज्यांत नव्या गर्भनिरोधकाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.
advertisement
2/5
सामान्यपणे कंडोम आणि कॉपर टी हे प्रायव्हेट पार्टमध्ये लावले जातात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल नवा गर्भनिरोधक प्रायव्हेट पार्टमध्ये नाही तर हातात बसवावा लागणार आहे. हो तुम्ही बरोबर वाचलंत. हाताच्या कोपऱ्यात हा गर्भनिरोधक बसवला की 3 वर्षे प्रेग्नन्सी रोखता येईल सांगितलं जातं आहे.
advertisement
3/5
आता हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हे नवं गर्भनिरोधक आहे सबडर्मल इम्प्लांट, जे अत्यंत लहान आकाराचं असून काडीसारखं दिसतं. हाताच्या कोपराच्या त्वचेखाली ते बसवण्यात येतं. त्यात औषध असतं जे अत्यंत कमी प्रमाणात शरीरात जाऊन प्रेग्नन्सी कंट्रोल करण्याचं काम करतं.
advertisement
4/5
सबडर्मल इम्प्लांट 3 वर्षे गर्भधारणा रोखतं. त्यानंतर महिलेची इच्छा असेल तर ते काढून त्यात पुन्हा औषध भरून ते पुन्हा ती इम्प्लांट करू शकते.
advertisement
5/5
राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या माध्यमातून या गर्भनिरोधकाची उपलब्धता काही प्रमुख राज्यांत करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील तृतीत स्तरांवरील आरोग्य संस्थांचा यात समावेश आहे. येत्या काळात त्याची व्याप्ती मुंबई आणि इतर शहरांमध्ये वाढवण्यात येणार आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक फोटो)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कंडोम, पिल, कॉपर टीची गरज नाही! हाताला फक्त छोटी स्टिक, 3 वर्षे प्रेग्नन्सीचं टेन्शन नाही; महाराष्ट्रात नवं गर्भनिरोधक