
अमरावती : महानुभाव पंथामध्ये अनेक शुभ कार्यात पंचावतार महापूजन केले जाते. पंचावतार महापूजन म्हणजेच गोपाळ कृष्ण महाराज, परमेश्वर श्री चक्रधर स्वामी, दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज आणि गोंविंद प्रभू महाराजांचे 56 भोग आहेत. पंचावतार महापूजन हे मार्गशिष महिन्यात जास्तीत जास्त केले जाते. वर्षभरात सुद्धा अनेक शुभ कार्यात पंचावतार महापूजन करता येऊ शकते, असे तपस्विनी संगीता विराट यांनी सांगितले.