नवरात्रीत लाखो भाविकांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन, मंदिर संस्थानच्या तिजोरीत इतक्या कोटींची भर
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर संस्थानच्या तिजोरीत शारदीय नवरात्र महोत्सवा दरम्यान साडेसहा कोटीची भर पडली आहे. सोने-चांदीसह, देणगी पास, सिंहासन पेटीमधून तुळजा भवानी मातेच्या मंदिरात भाविकांनी भरभरून दान दिले. याचबाबत लोकल18 च्या टीमचा हा आढावा. (उदय साबळे/धाराशिव, प्रतिनिधी)
advertisement
1/6

शारदीय नवरात्रोत्सवा दरम्यान महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानला दर्शनपाससह वेगवेगळ्या स्वरूपात भाविकांकडून भरभरून दान करण्यात आले आहे.
advertisement
2/6
यावर्षी नुकत्याच पार पडलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आई श्री तुळजाभवानी मातेच्या तिजोरीत साडेसहा कोटी रुपयांपेक्षा अधिकची भर पडली आहे.
advertisement
3/6
यामध्ये सोने, चांदी, देणगी पास, सिंहासन पेटी आशा माध्यमातून तुळजाभवानी मंदिर संस्थानला 6 कोटी 1 लाख, तर सोन्या-चांदीच्या माध्यमातून 65 लाख, असे एकूण 6 कोटी 66 लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न देवीच्या तिजोरीत जमा झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
advertisement
4/6
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव 3 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत मोठया उत्साहात पार पडला.
advertisement
5/6
दरम्यान, महाराष्ट्रासह शेजारील असणाऱ्या कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात या राज्यातूनही लाखो भाविक तुळजापूर नगरीत दाखल झाले होते.
advertisement
6/6
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दरम्यान लाखो भाविकांनी कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. तसेच या नवरात्र महोत्सवात दरम्यान, कोजागिरी व अश्विनी पौर्णिमा निमित्त जवळपास 9 लाखांच्या वर भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
नवरात्रीत लाखो भाविकांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन, मंदिर संस्थानच्या तिजोरीत इतक्या कोटींची भर