Dream Interpretation: भाग्यवान लोकांना स्वप्नात या गोष्टी दिसतात! दिवाळीत नशीब चमकण्याचे ते संकेत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dream Interpretation marathi: स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ असतो. स्वप्ने आपल्याला भविष्यात घडणाऱ्या काही घटनांचे संकेत देतात. दिवाळीच्या काळात धनाची देवी लक्ष्मीचे स्वप्न पडणं खूप शुभ मानले जाते. या स्वप्नाचा अर्थ, तुम्हाला लवकरच मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. स्वप्नात लक्ष्मीचे दर्शन होण्याचा अर्थ काय असू शकतो, त्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/7

स्वप्नात देवी लक्ष्मी पाहणे, म्हणजे तुमचे निद्रिस्त भाग्य जागृत होणार आहे. हे स्वप्न आर्थिक लाभ दर्शवते. हे स्वप्न सांगते की तुमच्यावर देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे.
advertisement
2/7
देवी लक्ष्मीचे स्वप्न पाहणे हे सूचित करते की, तुमच्या घरात लवकरच संपत्ती येणार आहे. हे स्वप्न सांगते की, देवी लक्ष्मी धनाच्या रूपात तुमच्या घरी येणार आहे. अशा स्थितीत देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तुम्हाला तुमच्या स्वप्नाचे फळ लवकरच मिळेल.
advertisement
3/7
जर तुमच्या स्वप्नात लक्ष्मी तिच्या वाहनावर, घुबडावर बसलेली दिसली तर याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला कुठूनतरी अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. तुमचे जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. हे स्वप्न देखील शुभतेचे लक्षण आहे.
advertisement
4/7
स्वप्नात लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती एकत्र दिसली तर ती देखील खूप शुभ मानली जाते. हे स्वप्न सांगते की येणाऱ्या काळात तुमची सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटका होणार आहे.
advertisement
5/7
स्वप्नात लक्ष्मी मातेला नारायणासोबत पाहणे खूप शुभ मानले जाते. नारायण म्हणजेच भगवान विष्णू हे यशाचे सूचक मानले जातात. हे स्वप्न सूचित करते की, आर्थिक लाभासोबतच तुम्हाला लक्ष्मी-नारायणाचा आशीर्वादही मिळेल.
advertisement
6/7
स्वप्नात देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती पाहणे म्हणजे तुमच्या आयुष्यातून सर्व आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. हे स्वप्न सूचित करते की, तुमचे प्रलंबित काम पूर्ण करण्याची वेळ आली आहे.
advertisement
7/7
जर तुम्ही स्वप्नात स्वतःला लक्ष्मीची पूजा करताना पाहिले तर याचा अर्थ तुमचे भाग्य लवकरच चमकणार आहे. हे स्वप्न नोकरीत प्रगती दर्शवते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Dream Interpretation: भाग्यवान लोकांना स्वप्नात या गोष्टी दिसतात! दिवाळीत नशीब चमकण्याचे ते संकेत