Mahabharat: श्रीकृष्णानं कुणाला दिला होता अंगातून दुर्गंधी वाहण्याचा शाप? असं नेमकं काय घडलं होतं?
- Published by:Isha Jagtap
Last Updated:
महाभारतात जेवढे वरदान दिले गेले, तेवढेच त्यातले शापही गाजले. आज आपण महाभारतातले असे 4 शाप जाणून घेणार आहोत, ज्यांची सर्वत्र प्रचंड चर्चा झाली.
advertisement
1/5

महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण गांधारीचं सांत्वन करायला गेले तेव्हा आपल्या पुत्रांचा विनाश पाहून गांधारीनं श्रीकृष्णाला शाप दिला. जसे पांडव आणि कौरव आपापसांत फूट पडून नष्ट झाले तसेच तुझे बंधू-बांधवही नष्ट होतील. आजपासून छत्तीसाव्या वर्षी बंधू-बांधवांचा आणि पुत्रांचा नाश झाल्यानंतर तू एका सर्वसामान्य कारणानं अनाथ म्हणून मरशील.
advertisement
2/5
महाभारत युद्धाच्या अंतकाळी जेव्हा अश्वत्थामानं फसवणुकीनं पांडव पुत्रांचा वध केला आणि पांडवांवर ब्रह्मास्त्राचा वार केला तेव्हा अर्जुनानंही आपलं ब्रह्मास्त्र सोडलं. महर्षी व्यासांनी हे दोन्ही अस्त्र धडकण्यापासून वाचवले आणि अश्वत्थामा व अर्जुनाला आपापले ब्रह्मास्त्र परत घेण्यास सांगितले. तेव्हा अर्जुनानं आपलं ब्रह्मास्त्र परत घेतलं. परंतु अश्वत्थामाला ही विद्या ठावूक नव्हती. त्यामुळे त्यानं आपल्या ब्रह्मास्त्राची दिशा बदलून अभिमन्यूनची पत्नी उत्तराच्या गर्भाकडे केली. हे पाहून श्रीकृष्णानं अश्वत्थामाला शाप दिला. तू 3 हजार वर्ष या पृथ्वीवर भटकत राहशील. कोणत्याही प्रकारे कोणत्याच पुरुषाशी तुझा संवाद होणार नाही. तुझ्या शरीरातून दुर्गंधी निघेल. त्यामुळे तू माणसांमध्ये राहू शकणार नाही. दुर्मीळ झाडा-झुडुपांमध्ये पडून राहशील.
advertisement
3/5
मान्यतेनुसार, जेव्हा घटोत्कच पहिल्यांदा त्याचे पिता भिम यांच्या राज्यात आला, तेव्हा आपली आई हिडिम्बाच्या आज्ञेनुसार त्यानं द्रौपदीचा अनादर केला. हा अपमान द्रौपदीला जावणला आणि खूप राग आला. ती त्याच्यावर चिडली आणि म्हणाली, 'मी विशिष्ट स्त्री आहे, युधिष्ठरची राणी आहे, ब्राह्मण राजाची पुत्री आहे, पांडवांपेक्षा प्रतिष्ठित आहे.' परंतु घटोत्कचने आपल्या दुष्ट राक्षसी आईच्या सांगण्यावरून मोठमोठे ऋषी आणि राजांच्या भरलेल्या सभेत तिचा अपमान केला. त्यावर तिनं शाप दिला की, जा...तुझं आयुष्य खूप छोटं होईल. तू कोणत्याही युद्धाशिवाय मारला जाशील. जर हा शाप नसता तर एकट्या घटोत्कचने कौरवांचा नाश केला असता, असं म्हटलं जातं.
advertisement
4/5
सत्यवती शांतनूचे पुत्र विचित्रवीर्य तरुण झाल्यानंतर भीष्मानं बलपूर्वक काशीराजच्या 3 मुलींचं अपहरण केलं. त्याला त्यांचं लग्न विचित्रवीर्याशी लावून द्यायचं होतं. कारण भिष्माला कोणत्याही परिस्थितीत आपले पिता शांतनू यांचं कूळ वाढवायचं होतं. परंतु नंतर मोठी राजकुमारी अम्बाला सोडून दिलं, कारण तिला शाल्वराज आवडत होता. मात्र शाल्वराजकडे जाताच त्यानं तिला स्वीकारण्यास नकार दिला. अम्बासाठी परशुरामलाही काहीच करता आलं नाही. हतबल झालेल्या अम्बानं देहत्याग करण्याचा निर्णय घेतला. देहत्याग करताना ती भिष्माला म्हणाली, 'तू माझं आयुष्य बरबाद केलंस आणि आता माझ्याशी लग्न करण्यासही नकार देतो आहेस. तू तुझ्या शक्तीचा दुरुपयोग केला आहेस. मी तुझं काहीच नाही बिघडवू शकत. परंतु मी पुरुषाच्या रुपात पुन्हा जन्म घेईन आणि तुझ्या अंताला कारणीभूत ठरीन. असं म्हणतात की, याच अम्बानं प्राण त्यागून शिखंडीच्या रुपात जन्म घेतला आणि भिष्माच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Mahabharat: श्रीकृष्णानं कुणाला दिला होता अंगातून दुर्गंधी वाहण्याचा शाप? असं नेमकं काय घडलं होतं?