Numerology: या जन्मतारखेच्या व्यक्ती असतात सौंदर्याच्या चाहत्या, स्वत:ही दिसतात अत्यंत देखण्या!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपल्या आयुष्यात जेवढं राशीला महत्त्व असतं, तेवढंच विशेष महत्त्व जन्मतारखेलाही आहे. 1 ते 9 अंकांचा थेट नवग्रहांशी संबंध असतो, असं अंकशास्त्र सांगतं. या प्रत्येक अंकाचं एक विशिष्ट ग्रह प्रतिनिधित्त्व करतो. त्यामुळे आपल्या जन्मतारखेचा जो ग्रह आहे, त्याचे आपल्याला कळत-नकळतपणे फायदे मिळत असतात. त्यावरूनच आपला स्वभाव आणि भाग्य ठरतं, असं म्हणतात. (ईशा बिरोरिया, प्रतिनिधी / ऋषिकेश)
advertisement
1/7

प्रत्येक मूलांकाच्या व्यक्तींचं काहीना काहीतरी वैशिष्ट्य असतं. काही मूलांकाच्या व्यक्ती अतिशय भाग्यवान मानल्या जातात. कदाचिक हे अंक आपलेही असू शकतात.
advertisement
2/7
जर आपली जन्मतारीख 1 ते 9 दरम्यान असेल तर तोच आपला मूलांक असतो. जर आपला जन्म 2 आकडी तारखेला झाला असेल तर त्या दोन्ही अंकांची बेरीज करायची, जोपर्यंत त्यातून 1 अंकी उत्तर मिळत नाही तोपर्यंत हे गणित करत राहायचं. मग मिळणारं उत्तर हा आपला मूलांक असतो. उदाहरणार्थ, जर आपली जन्मतारीख 29 असेल तर गणित होईल 2+9=11 मग 1+1=2 म्हणजेच 2 हा आपला मूलांक असेल.
advertisement
3/7
उत्तराखंडच्या ऋषिकेश भागातील प्रसिद्ध ज्योतिषी अखिलेश यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं, ज्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो त्या अत्यंत भाग्यवान मानल्या जातात. कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मणाऱ्या व्यक्तींचा मूलांक असतो 6.
advertisement
4/7
मूलांक 6 असलेल्या व्यक्तींना जणू प्रेम, समृद्धी आणि आकर्षक रुपाचं वरदान मिळालेलं असतं. हे लोक स्वत: सुंदर दिसतातच, शिवाय इतरांप्रती सौंदर्य आणि कलाप्रेमी असतात.
advertisement
5/7
या व्यक्ती स्वभावानं प्रचंड दयाळू असतात, इतरांच्या मदतीला सदैव धावून जातात. त्यांच्यात अफाट सकारात्मकता असते. हेच त्यांचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मानलं जातं कारण त्यांच्याकडून इतरांनाही भरपूर सकारात्मकता मिळते.
advertisement
6/7
या व्यक्ती आयुष्यात सहज बॅलन्स राखतात. कोणत्याही परिस्थितीत शांत राहतात. तसंच कोणत्याही परिस्थितीतून समृद्धी मिळवू शकतात. त्यांच्या आयुष्यात आकर्षण आणि प्रेमाचं वर्चस्व असतं. त्यातूनच त्या नशीबवान ठरतात.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Numerology: या जन्मतारखेच्या व्यक्ती असतात सौंदर्याच्या चाहत्या, स्वत:ही दिसतात अत्यंत देखण्या!