TRENDING:

श्रावणासोबत 5 राशींचा गोल्डन काळ सुरू! बुध ग्रह उलट होतोय, त्याची कृपा तुमच्यावर

Last Updated:
हरिद्वारचे ज्योतिषी पंडित शशांक शेखर यांनी सांगितलं की, ग्रहांचा राजकुमार असलेल्या बुध ग्रहाला बुद्धी, ज्ञान, धन, सुख, समृद्धी आणि आरोग्याचं प्रतीक मानतात. त्यामुळे कुंडलीत या ग्रहाचं स्थान भक्कम असेल तर व्यक्तीला धन-समृद्धी सारंकाही मिळतं. आता तर बुध ग्रह चक्क उलट होणार आहे. त्यामुळे याचा परिणाम राशींवर होणार हे निश्चित. (ओम प्रयास, प्रतिनिधी / हरिद्वार)
advertisement
1/7
श्रावणासोबत 5 राशींचा गोल्डन काळ सुरू! बुध ग्रह उलट होतोय, त्याची कृपा तुमच्यावर
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजून 27 मिनिटांनी बुध कर्क राशीतून सिंह राशीत जाईल. इथंच हा ग्रह उलट होणार आहे. ग्रह उलट होणार म्हणजे अडचणी वाढणार असं वाटतंय खरं, मात्र यामुळे चक्क काही राशींचा गोल्डन काळ सुरू होईल, असं ज्योतिषी म्हणाले. विशेष म्हणजे 5 ऑगस्टपासूनच श्रावण सुरू होतोय.
advertisement
2/7
वृषभ : आपल्यासाठी ऑगस्ट सर्वोत्तम असेल. बुध ग्रह सिंह राशीत उलट होणार असल्यानं वृषभ राशीच्या व्यक्तींची सर्व रखडलेली कामं मार्गी लागतील. नोकरीच्या शोधात असाल, तर आता उत्तम संधी मिळेल.
advertisement
3/7
मिथुन : आपल्यासाठी बुध ग्रहाची उलट चाल फायदेशीर ठरेल. परदेशी प्रवास होऊ शकतो. तिथे कामाची संधीही मिळू शकते. तसंच रखडलेली सर्व कामं पूर्ण होतील.
advertisement
4/7
सिंह : आपल्याला कामाबाबत शुभ प्रसंग अनुभवायला मिळतील. बुध उलट होण्यास असल्यानं याचा परिणाम थेट आपल्या बोलण्यावर होईल आणि त्यातूनच उत्तम संधी मिळतील. नोकरीत बढती मिळण्याचीही शक्यता आहे.
advertisement
5/7
कन्या : या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यामुळे आपल्याला बुध उलट झाल्याचा विशेष लाभ मिळेल, धनसंपत्तीत वृद्धी होईल, आपला मान-सन्मान वाढेल.
advertisement
6/7
कुंभ : नोकरी करत असाल तर आता <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/saturn-will-bless-three-zodiac-signs-but-they-will-get-trouble-too-l18w-mhij-1225166.html">यश मिळेल</a>. जबाबदारी वाढेल, त्यामुळे कामाचा व्यापही वाढू शकतो. व्यवसायात नफा मिळेल, उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. <a href="https://news18marathi.com/religion/what-shivamuth-in-shravan-msdp-mhij-1223937.html">धार्मिक कार्यात</a>ही सहभागी व्हाल.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
श्रावणासोबत 5 राशींचा गोल्डन काळ सुरू! बुध ग्रह उलट होतोय, त्याची कृपा तुमच्यावर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल