Ganesh Chaturthi: चुकूनही बसवू नका गणपतीची अशी मूर्ती, घर-दुकानावर होतो विपरीत परिणाम
- Published by:Mohini Vaishnav
- Written by:News18 Marathi
Last Updated:
Ganesh Chaturthi: गणेशोत्सवाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. अवघ्या 15 दिवसात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे.
advertisement
1/10

भगवान गणेश हे पहिले पूजनीय दैवत आहे. जर तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये गणपतीची मूर्ती स्थापित करत असाल तर त्यांची पूजा करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा.
advertisement
2/10
गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये त्यांची सोंड डाव्या हाताकडे वळलेली असावी. उजव्या हाताकडे नसावी.
advertisement
3/10
घरात बसलेल्या स्थितीत गणपतीची मूर्ती किंवा फोटो आणि दुकानात किंवा कार्यालयात उभी गणेशाची मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.
advertisement
4/10
श्रीगणेशाची मूर्ती बसवताना लक्षात ठेवा की, देवाचे मुख दक्षिणेकडे नसावे. याचा विपरीत परिणाम घर आणि दुकानावर होऊ शकतो.
advertisement
5/10
घरात आणि दुकानात गणेशमूर्ती ठेवताना त्याचे दोन्ही पाय जमिनीला लागलेले असावेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे कामात स्थिरता आणि यश मिळते.
advertisement
6/10
ज्यांना सर्व मंगलाची इच्छा आहे त्यांनी सिंदूर रंगाच्या गणपतीची पूजा करावी. असे केल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात.
advertisement
7/10
घरामध्ये गणपतीचे चित्र लावताना लक्षात ठेवा की चित्रात मोदक आणि उंदीर असणे आवश्यक आहे. यामुळे घरात भरभराट राहते.
advertisement
8/10
घराच्या मुख्य गेटवर गणपतीच्या दोन मूर्ती किंवा फोटो लावावे. दोन्ही गणेशाच्या पाठी टेकलेल्या हव्यात. असे केल्याने सर्व वास्तुदोष दूर होतात.
advertisement
9/10
ज्यांना घरात आणि दुकानात सुख, शांती आणि समृद्धीची इच्छा असेल त्यांनी पांढऱ्या रंगात विनायकाची मूर्ती किंवा चित्र लावावे.
advertisement
10/10
घराचा जो भाग वास्तुनुसार योग्य नाही, त्या ठिकाणी तुप मिसळून सिंदूर लावून भिंतीवर गणपतीच्या रूपात स्वस्तिक बनवल्याने वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो. (डिस्क्लेमर : सामान्य माहितीच्या आधारावर या गोष्टी सांगितल्या आहेत. न्यूज 18 याशी सहमत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
Ganesh Chaturthi: चुकूनही बसवू नका गणपतीची अशी मूर्ती, घर-दुकानावर होतो विपरीत परिणाम