इथं आहे देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर, अधिक मासात भरते यात्रा, PHOTOS
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
भारतातील एकमेव पुरुषोत्तमाचे मंदिर माहित आहे का? अधिक मासात भारतभरातून भाविक दर्शनासाठी येतात.
advertisement
1/11

अधिक मास हा धार्मिक व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. दान धर्म, धार्मिक विधी, पूजा पाठ या महिन्यात मोठ्या प्रमाणात होत असतात. धोंडा महिना, पुरुषोत्तम मास या नावांनीही हा महिना ओळखला जातो.
advertisement
2/11
भगवान पुरुषोत्तमाची पूजा या महिन्यात मोठ्या प्रमाणात होत असते. भारतातील एकमेव असणारं पुरुषोत्तमाचं मंदिर महाराष्ट्रात असून <a href="https://lokmat.news18.com/maharashtra/beed/">बीड जिल्ह्यातील</a> पुरुषोत्तमपुरी येथे सध्या भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे.
advertisement
3/11
हिंदू धर्मात अधिक महिन्यात भगवान पुरुषोत्तमाच्या पूजेचे मह्त्त्व आहे. त्यामुळे राज्यातूनच नाही तर परराज्यातूनही मोठ्या संख्येने भक्त भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येत असतात.
advertisement
4/11
प्रत्येक गाव खेड्यात विविध देव देवतांची मंदिरे असतात. मात्र, भगवान पुरुषोत्तमाचं मंदिर संपूर्ण भारतात एकच असल्याचं सांगितलं जातं. बीड जिल्ह्यातील माजलगावहून 22 किलोमीटर अंतराव पुरुषोत्तम पुरी हे गाव आहे. या गावात हे मंदिर आहे.
advertisement
5/11
गोदावरी तटावर हे हेमाडपंथी मंदिर असून या मंदिराचे बांधकाम सुमारे 1500 वर्षांपूर्वी झाल्याचा शिलालेख येथे आहे. या मंदिराचा कळस व बांधणी ही केदारनाथ मंदिर (उत्तराखंड) पध्दतीची आहे.
advertisement
6/11
शेजारीच वरदविनायक, सहलक्षेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदीर आहे. ही दोन्ही मंदिरे जुनी असल्याचे दिसते. वरदविनायक मंदीर हे वृंदावनातील कृष्णमंदीराची प्रतिकृती असल्याचे दिसते.
advertisement
7/11
मुख्य पुरूषोत्तम मंदीरातील पुरूषोत्तमाची मुर्ती ही गंडळी शिलेची असून ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. चतुर्थभुजाधारी पुरूषोत्तमाच्या हातात शंख, चक्र, पद्म असून मुर्ती मनमोहक अशी आहे.
advertisement
8/11
हे मंदीर स्थापत्य कलेचा आदर्श नमुना असून मंदिराच्या विटा या पाण्यावर तरंगतात. तर मंदिरातील गरुडध्वजा पंढरपूर येथील मंदिराची आठवण करून देतात, असे भाविक सांगतात.
advertisement
9/11
या मंदिराची आख्यायिका अशी की, पूर्वी शार्दुल नावाचा राक्षस पंचक्रोशीतील जनतेला त्रास देत होता. भगवान विष्णू यांनी पुरुषोत्तम अवतार घेऊन त्याचा शिरच्छेद केला. ते चक्र गोदावरीच्या पाण्यात धुतले म्हणून आज देखील हे तीर्थ चक्रतीर्थ म्हणून ओळखले जाते.
advertisement
10/11
भाविक या चक्रतीर्थवर स्नान करतात व पशुधारी सावळ्याचे म्हणजेच विठोबाचे दर्शन घेतात, असे मंदिराचे अध्यक्ष विजय गोळेकर सांगतात.
advertisement
11/11
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
इथं आहे देशातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर, अधिक मासात भरते यात्रा, PHOTOS