TRENDING:

72 फूट उंच अन् 1 हजार टन वजन; डोळे दिपवणारं गणेशाचं भव्य रूप, पाहा आहे कुठे?

Last Updated:
निसर्गाच्या सान्निध्यात अगदी साधेपणाने असणाऱ्या गणेशाच्या एका 72 फुटी मूर्ती विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
advertisement
1/7
72 फूट उंच अन् 1 हजार टन वजन; डोळे दिपवणारं गणेशाचं भव्य रूप, पाहा आहे कुठे?
गणपतीची प्रसिद्ध, ऐश्वर्यसंपन्न, भक्तांच्या गर्दीने गजबजलेली स्थळं सर्वानाच माहीत असतात. पण काही मंदिरं या सगळ्या झगमगाटापासून दूर कुठे तरी रानावनात, डोंगरकपारींत, गडकिल्ल्यांवर एकटीच वसलेली असतात. निसर्गाच्या सान्निध्यात अगदी साधेपणाने असणाऱ्या गणेशाच्या एका 72 फुटी मूर्ती विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
advertisement
2/7
जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत साेमाटणे फाटा येथे सह्याद्रीच्या डाेंगररांगांत सरला बसंतकुमार बिर्ला यांच्या संकल्पनेतून 72 फूट उंचीची भव्य गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. तिचे वजन 1 हजार टन असून ती जगातील सर्वाधिक वजन असलेली गणेशमूर्ती म्हणून ओळखली जाते. सिमेंट काँक्रीट, स्टील, तांबे वापरत मूर्ती उभारण्यासाठी अडीच वर्षे लागली.
advertisement
3/7
जानेवारी 2009 मध्ये प्रतिष्ठापना झाली. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी पायथ्यापासून एकूण 179 पायऱ्या चढून जावे लागते. दर 4 वर्षांनी मूर्तीवर तांब्याचा लेप लावून तिला नवी झळाळी देण्यात येते.
advertisement
4/7
ही मूर्ती राजस्थानचे कारागीर मातुराम वर्मा आणि नरेश वर्मा यांनी घडवली आहे. जानेवारी 2009 मध्ये चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी तेजोमयानंदजी यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले.
advertisement
5/7
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सिमेंट काँक्रिटमध्ये ही मूर्ती उभारली आहे. मूर्तीवर तांब्याचा मुलामा आहे. या मूर्तीची निर्मिती 16 एकर जागेत झाली आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि हिरवाईने वेढलेले पुण्यातील बिर्ला गणपती मंदिर असंख्य भाविकांना आकर्षित करते.
advertisement
6/7
संध्याकाळी या ठिकाणी लाईट्स सोडल्याने मूर्ती आणखीच सुंदर दिसते. या ठिकाणावरून जुना पुणे-मुंबई रस्ता, देहूरोडचा काही भाग आणि आजुबाजूचा परिसर छान दिसतो. हा विशेषतः पावसाळयात हा परिसर सभोवतातील हिरव्यागार शेतीमुळे पाहण्यासारखा असतो.
advertisement
7/7
बिर्ला समूहाने भारतभर मंदिरे बांधली आहेत आणि त्यांचे मंदिराचे बांधकाम कुठेना कुठे सुरु असते. बिर्ला समूहाने बांधलेली म्हणून त्यांना बिर्ला मंदिर म्हणतात. नसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर अनेकांसाठी आकर्षणाचं प्रमुख केंद्र ठरत आहे . या ठिकाणी आसपासची तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय .
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/Temples/
72 फूट उंच अन् 1 हजार टन वजन; डोळे दिपवणारं गणेशाचं भव्य रूप, पाहा आहे कुठे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल