शनी-राहू दोषांमुळे अडचणीत बुडून जाते व्यक्ती; यावर उपाय किचनमध्येच!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
अनेकदा असं होतं, आपण खूप मेहनतीने पैसे कमवतो पण काही केल्या पैसा आपल्या हातात टिकतच नाही. घरात कोणी ना कोणी सतत आजारी असतं. अडचणींमागून अडचणी येतात. याचं कारण असू शकतं शनी किंवा राहू दोष. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/5

शनी आणि राहूला अत्यंत क्रूर ग्रह म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत या ग्रहांचं स्थान भक्कम असतं त्यांची भरभराट होते हे निश्चित, परंतु ज्यांच्यावर या दोन ग्रहांची कुदृष्टी पडते, त्यांना मात्र असह्य अडचणींचा सामना करावा लागतो.
advertisement
2/5
या दोन ग्रहांपैकी एकाही ग्रहदोषाचं सावट आयुष्यावर पडलं की, मग त्यापासून स्वत:ची सुटका करणं फार अवघड होतं. ती व्यक्ती आर्थिक संकटांमध्ये अशी बुडून जाते की, त्यातून बाहेर येणं तिच्यासाठी अवघड होतं. तिच्यावर आणि तिच्या घरावर कायम नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो.
advertisement
3/5
घाबरू नका, ज्योतिषशास्त्रात या दोन्ही दोषांवर अत्यंत रामबाण उपाय सांगितलेले आहेत. झारखंडमधील देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मद्गल सांगतात की, शनी आणि राहूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी 11 ग्रॅम ओव्याचं लहानसं गाठोडं बांधून बुधवारी घराच्या पूर्व दिशेत ठेवा. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शनी, राहूशी संबंधित सर्व दोष नष्ट होतील. कारण पूर्व दिशेतून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होत असतो. त्यामुळे या दिशेत सदैव देवी-देवतांचा वास असतो, असं म्हणतात.
advertisement
4/5
ओव्याचा उपाय आपण घराच्या उत्तर दिशेतही करू शकता. या दिशेत धनाची देवता कुबेराचा वास असतो असं म्हणतात. त्यामुळे या उपायानंतर शनी-राहूचा <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/3-zodiac-signs-will-get-into-trouble-as-2-enemy-planets-are-coming-together-l18w-mhij-1172399.html">प्रकोप</a> संपुष्टात येतो आणि घरातील व्यक्तींची आर्थिक भरभराट व्हायला सुरूवात होते. परंतु लक्षात घ्या, हा <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/there-is-no-shubh-muhurat-for-weddings-in-may-and-june-this-year-l18w-mhij-1172493.html">उपाय</a> करताना तुम्हाला कोणीही पाहायला नको.
advertisement
5/5
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
शनी-राहू दोषांमुळे अडचणीत बुडून जाते व्यक्ती; यावर उपाय किचनमध्येच!