आज त्रास होईल, होळीनंतर नशीब बदलेल! 4 राशींचा फायदाच फायदा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
31 मार्चला शुक्राचा मीनप्रवेश होईल. तिथं राहू आधीपासूनच विराजमान आहे. त्यामुळे मीन राशीत होणाऱ्या या दोन ग्रहांच्या युतीचा 4 राशींच्या व्यक्तींना भरभरून फायदा मिळेल. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
advertisement
1/6

होळीनंतर शुक्र ग्रहाचं राशीपरिवर्तन होणार आहे. जेव्हा शुक्र एखाद्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा परिणाम थेट सर्व राशींच्या सुखावर होतो. कारण शुक्राला सुख, संपत्ती आणि ऐश्वर्याचा कारक मानलं जातं. ज्या राशींना शुक्राचा आशीर्वाद मिळतो, त्यांच्यावर लक्ष्मी देवीचा कृपा सदैव राहते. मग त्यांची सर्व बिघडलेलं कामं सुरळीत होतात. आता त्याच्या आशीर्वादाने 4 राशींच्या व्यक्तींचं नशीब अगदी उजळून निघणार आहे. याबाबत झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल सांगतात की, तब्बल 25 वर्षांनी शुक्र आणि राहूची युती होणार आहे.
advertisement
2/6
वृषभ : आपली आर्थिक स्थिती कमालीची बदलणार आहे. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त अशी परिस्थिती असेल, त्यामुळे चांगली बचत होईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना आता चांगली संधी मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.
advertisement
3/6
कर्क : आपली सर्व अडकलेली कामं आता मार्गी लागतील. वाहन, जमीन, मालमत्ता खरेदीचा योग आहे. नातेसंबंध सुधारतील. कुटुंबात प्रचंड आनंदाचं वातावरण असेल. घरात धार्मिक कार्य पार पडू शकतं.
advertisement
4/6
कन्या : आपल्याला भरभरून सुख मिळेल. करियरमध्ये प्रगती होईल. गुंतवणूक केली तर त्यातून चांगला नफा मिळेल. शेअर मार्केटमध्ये अडकलेले आपले पैसे आता परत मिळतील.
advertisement
5/6
तूळ : आपल्याला नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामानिमित्त लांबचा प्रवास होऊ शकतो. ज्यातून भरपूर फायदा होईल. जोडीदारासोबत धार्मिक प्रवास होईल. ज्यामुळे मन प्रसन्न राहील. आरोग्यही उत्तम साथ देईल.
advertisement
6/6
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.)