रात्र झाली की, आजही 'या' मंदिरात येतो भनायक आवाज; छत नसलेल्या मंदिरामागचं रहस्य काय?
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
हिरापूर गावात चौसष्ठ योगिनी मंदिर हे शक्तीपीठ आहे. इ.स. 864 मध्ये राणी हिरादेवी यांनी बांधलेले हे भारतातील पहिले छप्पर नसलेले योगिनी मंदिर आहे, जे महामाया पीठ...
advertisement
1/5

ओडिशा राज्यातील भुबनेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हिरापूर गावात चौसष्ठ योगिनी मंदिर हे शक्तीपीठ स्थापन केले आहे. या मंदिराची वैशिष्ट्ये खूपच अनोखी आहेत. हे मंदिर शक्तीच्या पूजेसाठी बांधले गेले आहे. त्यामुळे या मंदिराला महामाया पीठ असेही म्हणतात.
advertisement
2/5
हे मंदिर इ.स. 864 मध्ये लोणाभद्रा ऊर्फ शांतिकर्देव द्वितीय यांच्या भूमी वंशाची राणी हिरादेवी यांनी बांधले होते असे मानले जाते. हे भारतातील पहिले चौसष्ठ योगिनी मंदिर आहे. स्थानिक पुजाऱ्यांच्या मते, या मंदिरामागील आख्यायिका अशी आहे की, एका राक्षसाचा पराभव करण्यासाठी देवी दुर्गाने 64 देवींचे रूप घेतले होते. या देवीसाठीच हे चौसष्ठ योगिनी मंदिर बांधले गेले.
advertisement
3/5
या मंदिराचे स्थापत्यशास्त्र तुम्हाला आश्चर्यचकित करेल. सर्वसाधारणपणे सर्व मंदिरांचा वरचा भाग बंद असतो, तर या मंदिराचा वरचा भाग पूर्णपणे खुला आहे. हे छत नसलेले मंदिर तांत्रिक प्रार्थनांसाठी बांधण्यात आले आहे. तांत्रिक विधींमध्ये पृथ्वी म्हणजेच पंचमहाभूते - अग्नी, जल, पृथ्वी, वायू आणि आकाश यांची पूजा केली जात असल्याने, मंदिराचा वरचा भाग खुला ठेवला जातो.
advertisement
4/5
इथे प्राणी, राक्षस किंवा मानवी डोक्यावर उभ्या असलेल्या योगिनींच्या मूर्ती पाहून तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते. आख्यायिकेनुसार, इथल्या मूर्ती स्त्री शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहेत. या मूर्ती क्रोध आणि दुःखपासून ते आनंद, इच्छा आणि सुखापर्यंत सर्वकाही व्यक्त करतात.
advertisement
5/5
हे मंदिर एक विशेष ठिकाण आहे. इथे संध्याकाळी एक योगिनी (अध्यात्मिक स्त्री) फिरते असा सर्वसाधारणपणे विश्वास आहे. तिचा आवाजही ऐकू येतो. त्यामुळे, इथे येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक गावकरी सकाळी भेट देऊन दुपारपर्यंत निघून जाण्याचा सल्ला देतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
रात्र झाली की, आजही 'या' मंदिरात येतो भनायक आवाज; छत नसलेल्या मंदिरामागचं रहस्य काय?