5 फोटो, जे बदलू शकतात तुमचं आयुष्य; घराचं गोकूळ व्हायला लागणार नाही वेळ!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
प्रत्येकालाच सुख, शांती, समृद्धी हवी असते. परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की, आपल्या कुंडलीतील ग्रह-ताऱ्यांच्या वाईट स्थितीमुळे आयुष्यात अडचणी येतात आणि वास्तूशास्त्र सांगतं की, आजूबाजूच्या वस्तूंचा नकारात्मक परिणामही आपल्या आयुष्यावर होत असतो. त्यामुळे प्रत्येक वस्तू ही योग्य स्थितीत आणि योग्य दिशेतच असायला हवी. अगदी घरात लावलेल्या सकारात्मक फोटोंमुळेसुद्धा आपल्या अडचणी वाऱ्याच्या वेगाने दूर होऊ शकतात.
advertisement
1/6

घरात जर श्रीकृष्ण आणि राधेचा एकत्र फोटो असेल तर वैवाहिक जीवनात गोडवा येतो. त्यामुळे जर नवरा-बायकोमध्ये खटके उडत असतील तर, श्रीकृष्ण आणि राधेचा फोटो घरात लावण्याचा सल्ला वास्तूशास्त्रात दिला आहे.
advertisement
2/6

वास्तूतज्ज्ञ रणजीत मिश्रा सांगतात की, तुमचा व्यवसाय असेल आणि त्यातून मनासारखा नफा मिळत नसेल तर धावत्या घोड्याचा फोटो लावा. यामुळे व्यवसायही प्रचंड वेगाने चालेल आणि तेवढ्याच वेगाने तुम्हाला नफा मिळेल.
advertisement
3/6
रणजीत मिश्रा यांनी पुढे सांगितलं की, जर नवरा-बायकोच्या नात्यात विश्वास नसेल तर राजहंसाच्या जोडीचा फोटो लावा. त्यामुळे दोघांचं नातं घट्ट होतं.
advertisement
4/6
भगवान श्रीकृष्ण हे सर्वांनाच प्रिय आहेत. त्यांना प्रेमाने लाडू गोपाळही म्हणतात. त्यामुळे जर घरात त्यांचा फोटो लावला तर दाम्पत्याला लवकरच गोड बातमी मिळू शकते.
advertisement
5/6
घरात कृष्णाचा फोटो आई यशोदासोबत असेल, तर गरोदर स्त्रीच्या पोटातील बाळावर त्याचा अत्यंत <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/it-is-time-for-the-people-of-these-5-zodiac-signs-to-become-rich-l18w-mhij-1191244.html">सकारात्मक</a> परिणाम होतो आणि अगदी गोंडस बाळ जन्माला येतं.
advertisement
6/6
सूचना : येथे दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/religion/">धार्मिक</a> <a href="https://news18marathi.com/photogallery/religion/5-signs-that-give-you-the-message-of-upcoming-good-days-l18w-mhij-1191112.html">श्रद्धेवर</a> आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
5 फोटो, जे बदलू शकतात तुमचं आयुष्य; घराचं गोकूळ व्हायला लागणार नाही वेळ!