उपाय अगदी सोपे पण रामबाण!...मग लक्ष्मी घरापासून दूर राहूच नाही शकणार
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आयुष्यात सतत अडचणी येत असतील तर आपल्याला निश्चितच आपल्या काही सवयी सुधारण्याची आवश्यकता असते. दैनंदिन कार्यात केलेल्या लहान लहान बदलांमुळे आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी दूर होऊ शकतात. शिवाय जगण्यात, विचारात सकारात्मक बदलही पाहायला मिळेल.
advertisement
1/4

हिंदू धर्मात गायीचं दर्शन हे कोट्यवधी देवांच्या दर्शनासम मानलं जातं. त्यामुळे गायीला चारा देण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. विशेषतः पोळीवर तूप घालून ते गायीला चारावं. त्यामुळे अनेक समस्या दूर होतात. शिवाय कुत्र्याला पोळी देणंदेखील शुभ मानलं जातं.
advertisement
2/4
शास्त्रांनुसार, शनिवारी मारुतीला लाल रंगाचं कापड अर्पण केल्याने त्यांची कृपा सदैव आपल्यावर राहते. शिवाय शनिवारी न विसरता मारुती मंदिरात जाऊन दिवा लावावा. त्यामुळे मारुती प्रसन्न होतात, असं मानलं जातं.
advertisement
3/4
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपालाही प्रचंड महत्त्व आहे. या रोपाला पाणी देणं अत्यंत शुभ मानलं जातं. शिवाय दररोज संध्याकाळी तूपाचा दिवा तुळशीत लावण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात.
advertisement
4/4
मारुतीला संकटमोचन मानलं जातं. त्यामुळे आपल्या सर्व अडचणी मूळापासून नष्ट करायच्या असतील, तर घरात दररोज हनुमान चालीसेचं पठण करावं. दररोज शक्य नसल्यास मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसेचं पठण करणं अनिवार्य आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
उपाय अगदी सोपे पण रामबाण!...मग लक्ष्मी घरापासून दूर राहूच नाही शकणार